Shubman Gill Fitness saam tv
Sports

वनडे मालिका सुरू असतानाच टीम इंडियासाठी गुड न्यूज! दुखापतग्रस्त शुभमन गिलबाबत BCCI कडून महत्वाची अपडेट

Shubman Gill Fitness : कोलकाता कसोटीत मानेला दुखापत झाल्यानंतर वनडे मालिकेतून बाहेर झालेला शुभमन गिल आगामी टी २० सामने खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही, याबाबत बीसीसीआयने महत्वाची अपडेट दिली आहे.

Nandkumar Joshi

भारताचा कसोटी कर्णधार आणि टी २० संघाचा उपकर्णधार शुभमन गिलबाबत बीसीसीआयनं महत्वाची माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेन्स अर्थात सीओईच्या टीमनं शुभमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात खेळण्यास मंजुरी दिली आहे. गिल हा दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध कोलकातामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्याची मान आखडली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं.

शुभमन गिल हा कसोटी संघाचा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात संघाला त्याची गरज असतानाच मानेला दुखापत झाली. त्याची मान आखडली होती. त्यामुळं त्याला मैदान सोडून जावं लागलं होतं. त्यानंतरच्या सर्व कसोटी सामन्यांना मुकावं लागलं होतं. याशिवाय वनडे मालिकेसाठीही तो उपलब्ध नव्हता. मात्र, टी २० मालिकेसाठी भारतीय संघात त्यालाही स्थान देण्यात आलं आहे. पण तो पहिला सामना खेळणार की नाही याबाबत साशंकता होती. आता त्याचा टी २० सामना खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीओईच्या टीमनं मंजुरी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरटीपीसाठी (क्रिकेटच्या मैदानात पुनरागमनासाठी) रिहॅबिलिटेशनशी संबंधित सर्व प्रोटोकॉल पूर्ण केले आहेत. सीओईकडून संघ व्यवस्थापनाच्या एसएसएम टीमला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शुभमन गिलने सीओईमध्ये रिहॅबिलिटेशन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे सिद्ध होण्यासाठी आवश्यक मापदंड पूर्ण केले आहेत. या टीममध्ये फिजिओ कमलेश जैन, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच एड्रियन ली रॉ आणि डॉ. चार्ल्स यांचा समावेश आहे.

कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी गिल जायबंदी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्याची मान आखडली होती. रुग्णालयात त्याला उपचार घ्यावे लागले. मानेच्या दुखापतीमुळं तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला नव्हता. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वनडे मालिकेतूनही त्याला बाहेर राहावे लागले होते. आगामी टी २० मालिकेसाठी १५ जणांच्या संघात त्याला स्थान देण्यात आले होते. पण त्याच्या खेळण्याबाबत आणि फिटनेसबाबत अनेक प्रश्नचिन्ह होते. पण आता ती शंकाही दूर झाली आहे. गिल पूर्णपणे फिट असून, तो पहिला टी २० सामना खेळू शकतो, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजनची आघाडी

Pune Municipal Corporation Election: अखेरच्या दिवशी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं; कोण किती जागांवर लढणार? फॉर्म्युला आला समोर

Maharashtra Politics : मोठी राजकीय घडामोड! राज ठाकरे अचानक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, कारण काय?

आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण? संपूर्ण पुण्यात जोरदार चर्चा

Alcohol Fact: दारु प्यायल्यावर अनेकांना जुनी नाती का आठवतात? कारण वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT