team india saam tv
क्रीडा

Team India News: अखेर प्रतीक्षा संपली! वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज

Ankush Dhavre

Jasprit Bumrah Bowling Practise Video: भारतीय संघाला यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धेपुर्वी टीम इंडियाच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघातील दिग्गज गोलंदाजाने कमबॅक करणार असल्याचे संकेत दिले आहेत. हा खेळाडू भारतीय संघातील मॅचविनर खेळाडूंपैकी एक आहे.

भारतीय संघाची प्रतीश्रा अखेर संपली..

भारतीय संघातील घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये तो आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट दिली होती. आता जसप्रीत बुमराहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज..

गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराह हा सध्या NCA मध्ये सराव करतोय. नुकताच बंगळुरूतील अलुर क्रिकेट मैदानावर इंट्रा स्कॉड सराव सामना पार पडला. या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तो आधी सारखीच धारदार गोलंदाजी करताना दिसून येत आहे. (Latest sports updates)

जसप्रीत बुमराहची कमतरता..

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला महत्वाच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला आशिया कप २०२२ आणि टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र भारतीय संघासाठी आनंदाची बाब अशी की, आशिया चषक आणि वर्ल्डकप सारख्या स्पर्धा तोंडावर असताना जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात कमबॅक होत आहे. तो आयर्लंड विरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून भारतीय संघात कमबॅक करू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT