Chennai Super Kings IPL 2023  Saam TV
Sports

Chennai Super Kings : महेंद्रसिंग धोनीचं टेन्शन मिटलं! IPL 2023 सुरू होण्याआधी मॅचविनर खेळाडू संघात परतला

Good News For CSK Fans: या बातमीने कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह चेन्नई सुपरकिग्जच्या चाहत्यांचं टेन्शन मिटलं आहे.

Satish Daud

IPL 2023 News: इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२३ चे वेळापत्रक नुकतेच जाहीर झालं आहे. यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आयपीएलचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपरकिग्ज संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह चेन्नई सुपरकिग्जच्या चाहत्यांचं टेन्शन मिटलं आहे. (Latest Sports Updates)

आयपीएलच्या (IPL 2023) इतिहासातील मुंबई इंडियन्सनंतरचा सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नईचा संघ ओळखला जातो. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिग्ज संघाने आयपीएलमध्ये आपली छाप सोडली आहे. चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.

यंदाच्या हंगामात देखील चेन्नईचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीत असल्याचं मानलं जातंय. कारण, धोनीकडे रवींद्र जडेजा, मोईन अली आणि बेन स्टोक यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. या वर्षी विजेतेपद मिळवल्यास चेन्नई सुपर किंग्ज हे मुंबई इंडियन्सच्या विक्रमी ५ विजेतेपदाशी बरोबरी करतील. (Team India

गेल्या हंगामात चेन्नईला (Chennai Super Kings) प्ले ऑफची फेरी गाठता आली नव्हती. यामागे सर्वात मोठं कारण चेन्नईचे गोलंदाज स्पर्धेत पूर्णपणे अपयशी ठरले होते. तब्बल १४ कोटी खर्च करून धोनीने विकत घेतलेला वेगवान गोलंदाज दीपक चहर हा हंगामाच्या सुरूवातील दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यामुळे चेन्नई संघाची पावरप्लेमध्ये मोठी कोंडी झाली होती. त्यांना झटपट विकेट्स घेता आल्या नव्हता.

दरम्यान, आयपीएल २०२३ मध्ये खेळण्यासाठी दीपक चहर पूर्णपणे फिट झाला असून तो संघासोबत जोडला जाणार आहे. याबाबत माहिती देताना दीपक चहर म्हणाला, मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. ३१ मार्चपासून तो संघासोबत जोडला जाईल. ३० वरषीय वर्षांच्या -फास्ट गोलंदाजाला तणाव फ्रॅक्चर आणि नंतर मांडीच्या तिसर्‍या इयत्तेच्या दुखापतीवर मात करणे खूप कठीण होते. बांगलादेशातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात तो अखेर खेळला जेथे तो फक्त तीन षटकांत गोलंदाजी करण्यास सक्षम होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखचं सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT