India women hockey team wins Asian Games gold after 44 years saam tv
Sports

Asian Games: भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सुवर्णपदक

Asian Games : भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम सामन्यात पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या चीनच्या संघाचा पराभव करून इतिहास घडवला.

Bharat Jadhav

  • भारतीय महिला हॉकी संघाने चीनचा 1-0 असा पराभव केला.

  • भारताने 44 वर्षांनंतर महिला हॉकीमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले.

  • भारतीय महिला हॉकी संघाने लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवली.

भारतीय महिला हॉकी संघाने ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलंय. ऐची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिला हॉकीचा अंतिम सामना भारत आणि चीन यांच्यात खेळला गेला. काकामिगाहारा येथील 'गिफू प्रीफेक्चरल ग्रीन स्टेडियम'वर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात भारताने चीनचा १-० असा पराभव केला. भारताच्या या विजयामुळे संघाने लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ (LA 2028) मधील स्थानही निश्चित केलंय. सलिमा टेटेचे नेतृत्व आणि स्योर्ड मारिजने यांचे प्रशिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवलेला हा ऐतिहासिक विजय आहे.

४४ वर्षांनी जिंकलं सुवर्णपदक

१९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचा समावेश करण्यात आला होता. त्या पहिल्याच स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आता ४४ वर्षांनी भारतीय संघाने या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. भारतीय महिला हॉकी संघ १९९८ आणि २०१८ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु अनुक्रमे दक्षिण कोरिया आणि जपानकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यासह भारतीय संघाने १९८६, २००६, २०१४ आणि २०२२ च्या स्पर्धांमध्ये कांस्यपदकेही जिंकली आहेत.

सविताची शानदार गोलकिपींग

सामन्याच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचे वर्चस्व राहिलं. सलिमा टेटे आणि साक्षी यांच्या उत्कृष्ट चालीनंतर, लालरेम्सियामीने 'रिव्हर्स-हिट'द्वारे केलेल्या प्रभावी फिनिश फटक्यानं निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर, दुसऱ्या सत्रात चीनने आक्रमक खेळ केला. चीनच्या संघाला दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. त्यांना २३ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकही मिळाला, परंतु त्यांना गोल करता आले नाहीत. झांग यिंगने हा पेनल्टी स्ट्रोक घेतला होता मात्र भारतीय गोलकीपर सविता पुनियाने उत्कृष्ट बचाव करत गोल होऊ दिला नाही.

तिसऱ्या सत्रातही चीनने आक्रमक खेळी केली. परंतु भारतीय गोलरक्षक आणि बचावपटूंनी त्यांचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडले. या कालावधीत चीनला एकूण तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. एका टप्प्यावर पंचांनी चीनला 'पेनल्टी स्ट्रोक' बहाल केला होता, मात्र भारतीय संघाने केलेल्या 'रिव्ह्यू'नंतर तो निर्णय बदलून 'पेनल्टी कॉर्नर' देण्यात आला.

चौथ्या सत्रातही चिनी खेळाडूंनी आक्रमणे केली, परंतु भारतीय बचावफळीने त्यांचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडले. चौथ्या सत्रात चीनला एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही. याचा फायदा भारतीय संघाला झाला. सामना संपल्याची अंतिम शिट्टी वाजताच भारतीय संघ आणि चाहत्यांनी जल्लोष केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: शनिवार-रविवारच्या 'या' ६ सवयींमुळे किडनी खराब होतेय? चुका आताच सुधारा

Maharashtra News Live Update: सहा तासाच्या चौकशीनंतर दिनू मोरियाला पोलिसांनी सोडलं

CJP च्या आंदोलनात जय श्रीरामच्या घोषणा! मुंबईत मोठा गोंधळ; पाहा VIDEO

Saturday Horoscope: आज या ४ राशींना मिळणार मोठी संधी; रखडलेली कामं मार्गी लागतील, वाचा राशीभविष्य

Sindhudurg Beach : कोकणातलं स्वर्ग सौंदर्य! सिंधुदुर्गतील 'या' निळ्याशार समुद्राचं आकर्षणच काही औरच

SCROLL FOR NEXT