virat kohli on glenn maxwell yandex
Sports

Virat Kohli: 'विराटने मला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं...' ग्लेन मॅक्सवेलने कारण सांगत केला मोठा खुलासा

Glenn Maxwell On Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ग्लेन मॅक्सवेलला इंस्टाग्रामवरुन ब्लॉक केलं होतं.

Ankush Dhavre

विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. दोघेही एकाच संघातून खेळतात. दोघांच्या मैत्रीच्या जोरदार चर्चा रंगतात. मात्र मॅक्सवेलला विराटने इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर दोघांची घट्ट मैत्री झाली. मॅक्सवेलने स्वत: हा मजेशीर किस्सा सांगितला आहे. नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये २०१७ मध्ये कसोटी मालिका रंगली होती. या मालिकेतील एका सामन्यात विराटच्या खांद्याला चेंडू लागला होता. त्यावेळी मॅक्सवेल विराटची नक्कल करताना दिसून आला होता. हे विराटला जराही पटलं नव्हतं. त्यानंतर विराटने मॅक्सवेलला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं होतं.

काय म्हणाला मॅक्सवेल?

ग्लेन मॅक्सवेलने LiSTNR पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने हा किस्सा सांगितला. आरसीबीमध्ये आल्यानंतर त्याला समजलं होतं की, विराटने त्याला ब्लॉक केलंय.

या पॉडकास्टमध्ये बोलताना मॅक्सवेल म्हणाला की, ' ज्यावेळी मला समजलं की, मी आरसीबीकडून खेळणार आहे, त्यावेळी विराट पहिला व्यक्ती होता ज्याने मला मेसेज केला आणि माझं वेलकम केलं. ज्यावेळी मी प्री आयपीएल ट्रेनिंग कॅम्पसाठी आलो, त्यावेळी आम्ही एकत्र वेळ घालवला. त्यानंतर मी सोशल मीडियावर त्याला फॉलो करायला गेलो. मी त्याचं नाव शोधत होतो, पण मला त्याचं नाव दिसतच नव्हतं.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' त्यानंतर मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला विचारलं, तू मला ब्लॉक केलंय? त्यावेळी तो म्हणाला, हो...हे तेव्हा झालं होतं जेव्हा तू माझी खिल्ली उडविली होती.. मी म्हणालो ठीक आहे. त्यानंतर त्याने मला अन्ब्लॉक केलं आणि आम्ही चांगले मित्र झालो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT