Gautam gambhir reaction  twitter
Sports

Gautam Gambhir Tweet: केकेआरच्या विजयानंतर गौतम गंभीरची पहिलीच प्रतिक्रिया; पोस्ट शेअर करत म्हणाला...

KKR vs SRH, IPL 2024 Final : कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएल २०२४ स्पर्धेतील विजेता संघ ठरला आहे. या विजयानंतर गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ankush Dhavre

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर १ दशक उलटूनही या संघाला जेतेपदावर नाव कोरता आलं नव्हतं. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कोलकाताने गंभीरची मेटाँरपदी नियुक्ती केली. त्याचा पायगुण कोलकातासाठी लकी ठरला. कोलकाताने फायनलमध्ये हैदराबादला धूळ चारत तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. दरम्यान या विजयानंतर गौतम गंभीरने एक ट्वीट केलं आहे, जे सध्या तुफान व्हायरल होत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. यावेळी संघमालकही संघासोबत जल्लोष साजरा करताना दिसून आले. ज्यात जुही चावला आणि शाहरुख खान यांचा समावेश होता. दरम्यान मेटाँरची भूमिका पार पाडत असलेला गौतम गंभीर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. संघातील सर्व खेळाडू त्याला विजयाचं श्रेय देताना दिसून आले. यासह गौतम गंभीरनेही संघातील खेळाडूंचं कौतुक केलं.

सामन्यानंतर त्याने ट्वीट केलं आहे. ज्यात त्याने गीतेचा एक श्लोक शेअर करत लिहिलं की, 'ज्यांचा विचार आणि कृती सत्यावर आधारित आहेत, त्यांचा रथ अजूनही श्रीकृष्ण चालवत आहेत.”

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर हा कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील फायनलचा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सला गोलंदाजीचं आमंत्रण दिलं.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. संपूर्ण डाव ११३ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना वेंकटेश अय्यरने अर्धशतकी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Male Fertility Decline: तुमच्या जेवणामध्ये असलेल्या 'या' एका घटकाने पुरुषांचा कमी होतो स्पर्म काउंट

Maharashtra Live News Update: खेड पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा

SCROLL FOR NEXT