gautam gambhir raised question on shreyas iyer team india spot for upcoming odi world cup 2023 cricket news in marathi Saam tv news
Sports

Gautam Gambhir Statement: 'तो NCA मध्ये काय करत होता?',अय्यरबद्दल बोलताना गंभीर भडकला

Gautam Gambhir On Shreyas Iyer: श्रेयस अय्यरबद्दल बोलताना गौतम गंभीरने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Gautam Gambhir On Shreyas Iyer:

आशिया चषकात दमदार खेळ करत भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं.

मात्र २ सामने खेळल्यानंतर त्याला बाकावर बसावं लागलं. दरम्यान आता श्रेयस अय्यरबाबत बोलताना माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केलं आहे.

माध्यमातील वृत्तानुसार गौतम गंभीर असं म्हणाला की, ' ही खूप चिंताजनक बाब आहे. इतके दिवस तो बाहेर होता. आशिया चषकात कमबॅक केलं, १ सामना खेळला आणि पुन्हा दुखापतग्रस्त झाला. मला मुळीच असं वाटत नाही की मोठ्या स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड होईल. '

याबाबत बोलताना तो पुढे म्हणाला की, ' येत्या काही दिवसात तुम्हाला दिसेल की तो संघाचा भाग नसेल. त्याची जागा दुसऱ्या खेळाडूने घेतलेली असेल. वर्ल्डकप स्पर्धेसाठी जाताना संघात फिट खेळाडू असणं गरजेचं आहे.

जरा विचार करा, एखाद्या खेळाडूला जर दुखापत झाली तर त्याची रिप्लेसमेंट मिळत नसते. त्यामुळे जर तो पूर्णपणे फिट झाला नाही तर त्याची दुखापत हे त्याला संघाबाहेर घेऊन जाण्याचं कारण बनू शकते. ' (Latest sports updates)

एनसीएबद्दल बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, ' जर जाब विचारायचा असेल तर एनसीएला विचारा. कारण इतके दिवस तो तिथेच होता. त्यानंतर त्याला फिटनेस सर्टिफिकेटही मिळालं. कदाचित त्याला फिटनेस सर्टिफिकेट खूप लवकर देण्यात आलं आहे.'

ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सुरूवातीच्या २ सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात श्रेयस अय्यरला देखील स्थान दिलं गेलं आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी देखील त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT