Gautam Gambhir On Virat Kohli and MS Dhoni Cricket Update
Gautam Gambhir On Virat Kohli and MS Dhoni Cricket Update SAAM TV
क्रीडा | IPL

विराट कोहली अन् धोनीचं नाव घेणं आधी बंद करा; गौतम गंभीर इतका का भडकला?...

Nandkumar Joshi

Gautam Gambhir On Virat Kohli and MS Dhoni | मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेला गौतम गंभीर हल्ली टीम इंडिया, खेळाडू यांच्याबाबत स्पष्ट आणि रोखठोक मते व्यक्त करतो. आता पुन्हा एका वक्तव्याने गौतम गंभीर चर्चेत आला आहे. भारतीय क्रिकेटनं एका क्रिकेटपटूची पूजा करणं बंद करावं. आपल्याला कपिल देव, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांसारखी नावं मागे टाकून आता टीम इंडियावर चर्चा करायला हवी, असं तो म्हणाला.

गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा आपल्या रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या दिग्गज खेळाडूविषयी बोलायचं म्हटलं तरी तो जरा सुद्धा कचरत नाही. गौतम गंभीरनं आता पुन्हा असंच बिनधास्त विधान केलं आहे. त्यामुळे त्याची सध्या चर्चा होत आहे. माध्यमांनीही फक्त एका खेळाडूवर नव्हे तर, संघातील इतर खेळाडूंकडेही लक्ष द्यावे, असा सल्ला गंभीरने दिला आहे. आपल्याला कुणा एका खेळाडूला मोठं करण्याऐवजी संपूर्ण टीम मोठी करण्यावर लक्ष दिलं पाहिजे, असंही तो म्हणाला.

गौतम गंभीर म्हणाला की, 'ज्या दिवशी विराट कोहलीनं (Virat Kohli) ७१ वे शतक ठोकले, त्याच सामन्यात भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या होत्या. मात्र, सर्वजण विराट कोहलीबद्दल बोलत होते. कुणीही भुवनेश्वरच्या बाबतीत बोललं नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे.'

मी एकटा असा होतो की, समालोचन करताना सातत्याने भुवनेश्वर कुमारच्या बाबतीत बोलत होतो. भुवनेश्वरने चार षटकांमध्ये पाच विकेट घेतल्या होत्या. याबाबत कुणाला काही माहीत असावं असं मला तरी वाटलं नाही, असंही गौतम गंभीर म्हणाला.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर म्हणाला की, विराट कोहलीनं शतक ठोकलं तर, संपूर्ण देश जल्लोष करत होता. भारताला आता एका हिरोच्या संस्कृतीतून बाहेर पडायला हवं. मग क्रिकेट असो की राजकारण. आपल्याला केवळ आणि केवळ भारतीय क्रिकेटचे गुणगान गायला हवेत, असंही तो म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले

Self Development Tips: स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःला लावा या '५' सवयी

Virat Kohli Viral Video: मन जिंकलस भावा! दिनेश कार्तिकडून ऑरेंज कॅप स्वीकारताच विराटने केलं असं काही- Video

SCROLL FOR NEXT