Former South African batsman AB de Villiers prediction on Team India Virat Kohli retirement icc world cup 2023 updates  Saam TV
Sports

Kohli ODI Retirement: विराट कोहली वर्ल्डकपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार; दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

Virat Kohli ODI Retirement: विराट कोहलीने विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यास आश्चर्य वाटू नये, असं एबी डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.

Satish Daud

Ab de Villiers Prediction on Virat Kohli ODI Retirement

विश्वचषक 2023 स्पर्धेला अगदी आठवडाभराचा कालावधी बाकी असताना दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. विराट कोहलीने विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यास आश्चर्य वाटू नये, असं एबी डिव्हिलियर्सने म्हटलं आहे. त्याच्या या भविष्यवाणीमुळे क्रिडाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) क्रिकेटचे 'रन मशीन' म्हणून ओळखले जाते. विराटची खेळाविषयी असलेली मजबूत मानसिकता, फलंदाजीची शैली आणि खेळाप्रती असलेला त्याचा आक्रमक दृष्टिकोन यामुळे त्याला हे बिरुद मिळाले आहे. अशातच विराट कोहलीने जर निवृत्तीचा मार्ग पत्कारला, तर भारतीय संघाच्या फलंदाजीत मोठी पोकळी निर्माण होईल.

एबी डिव्हिलियर्सने व्हिडीओत म्हटलं?

एबी डिव्हिलियर्सने आपल्या युट्यूबवरून आगामी विश्वचषक (Sport News) स्पर्धेचं विश्लेषण केलं. यावेळी त्याने विराट कोहलीचं विशेष कौतुक केलं. विराट कोहली सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. नुकत्यात झालेल्या आशिया चषक स्पर्धेत विराटने पाकिस्तानविरुद्ध आपले ४७ वे वनडे शतक पूर्ण केलं. भारताने आशिया कप स्पर्धा जिंकण्यात त्याचा मोलाचा वाटा होता, असं एबी डिव्हिलियर्स म्हणाला.

विराटच्या निवृत्तीबाबत डिव्हिलियर्स काय म्हणाला?

भारतीय संघ यंदाची विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा प्रमुख दावेदार असल्याचं एबी डिव्हिलियर्स म्हणाला. जर भारत जगज्जेता झाला, तर विराट कोहली वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करेल, असंही डिव्हिलियर्सने म्हटलं आहे. विराटकडे क्रिकेटसाठी अजूनही बराच वेळ बाकी आहे. मला वाटते तुम्ही विराटला निवृत्तीबाबत विचारलं, तर तोही तुम्हाला हेच सांगेल, असंही डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.

विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये

पुढे बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला, "जागतिक क्रिकेटमध्ये जवळपास प्रत्येक यश संपादन करणारा कोहली अजूनही त्याच वेगाने धावा काढत आहे. तो क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये मेन इन ब्लूसाठी (टीम इंडियासाठी) आवडता फलंदाज आहे. विराट कोहली अशा तुफान फॉर्ममध्ये असताना भारताने जर मायदेशात विश्वचषक स्पर्धा जिंकली, तर ही त्याच्या निवृत्तीची सर्वोत्तम वेळ असेल".

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT