pakistan cricket team  saam tv
Sports

Ramiz Raja Statement: 'जर तुम्हाला जिंकता नसेल तर...',पाकिस्तानचा दिग्गज आपल्याच खेळाडूंवर भडकला

Ramiz Raja: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आपल्याच खेळाडूंवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Ramiz Raja Statement:

भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत ७ गडी राखून विजय मिळवला आहे. पाकिस्तानी संघातील खेळाडूंना या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही.

या सुमार कामगिरीनंतर पाकिस्तानचे गोडवे गाणारे दिग्गज आपल्याच खेळाडूंवर टीका करताना दिसून आले आहेत. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीझ राजा यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर सडकून टिका केली आहे.

भारतीय संघाविरूद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर रमीझ राजा यांनी म्हटले की,' हे पाकिस्तानी लोकांच्या भावना दुखावणारं आहे. तुम्ही जेव्हा भारताविरूद्ध खेळता तेव्हा तुम्हाला हे माहित असायला हवं की, मैदानात उपस्थित असलेले ९९ टक्के लोक हे भारतीय संघाला सपोर्ट करणारे आहेत. ज्याचा परिणाम तुमच्यावर होणार हे नक्की. तुम्ही भारावून जाल हे मी समजू शकतो. जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर, निदान तुम्ही स्पर्धा तरी करायला हवी होती.'

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. या आमंत्रणाचा स्वीकार करत पाकिस्तानने अवघ्या १९२ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिजवानने ४९ धावा केल्या. (Latest sports updates)

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानी गोलंदाजांवर तुटून पडला. रोहितने ८६ धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

Cotton Saree Designs For Women: दिवाळीसाठी कॉटनच्या साड्या डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT