Abdul Razzaq Controversial Statement:  Saam tv
Sports

Abdul Razzaq Controversial Statement: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं ऐश्वर्या रायवर वादग्रस्त वक्तव्य, विधानामुळे नेटकरी संतप्त

Abdul Razzaq Controversial Statement: संघाच्या खराब कामगिरीवर भाष्य करताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने ऐश्वर्या रायवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Vishal Gangurde

Abdul Razzaq Controversial Statement:

विश्वचषकाच्या स्पर्धेतून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर गेली आहे. विश्वचषकात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ मायदेशी परतला आहे. संघाच्या खराब कामगिरीवर भाष्य करताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने ऐश्वर्या रायवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तानचा संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर पाकच्या माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर खेळाडू आणि क्रिकेटबोर्ड दोन्ही आहे. पाकिस्तानच्या एका कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रझाकने पाकिस्तान खेळाडूंच्या खराब कामगिरीवर भाष्य करताना लाजिरवाणं विधान केलं.

रझाकच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या कार्यक्रमात रझाकसोबत शाहीद अफ्रीदी , उमर गुल देखील होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अब्दुल रझाकने काय म्हटलं?

'स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करण्यासाठी नितीमत्ता चांगली असायला हवी. तुम्ही विचार करत असाल, मी ऐश्वर्या रायसोबत लग्न करू आणि संस्कारी- सर्वगुण संपन्न मुले जन्माला येईल, असं काही होत नाही. त्यासाठी पहिल्यांदा नितीमत्ता बदलावी लागेल, असं वक्तव्य अब्दुल रझाकने केलं. अब्दुलच्या वक्तव्यानंतर स्टेजवरील पाकचे माजी खेळाडूही हसू लागले. मात्र, अब्दुल रझाकच्या वक्तव्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तत्पूर्वी, पाकिस्तान क्रिकेट टीमने या स्पर्धेत ९ पैकी चार सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत पाकिस्तानला ५ सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं. पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये नाराजी पसरल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही आझमच्या नेतृत्वावर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट प्रकरणातील आरोपी मनिषा वाघमारेला "वर्टिगो" आजार

Gautami Patil-Bhau Kadam : 'हिल हिल पोरी हिला...'; गौतमी पाटील अन् भाऊ कदम यांच्या केमिस्ट्रीची जादू, पाहा Unseen Photo

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 92% ते 283% पर्यंत वाढ होणार? सरकार किती वाढवणार फिटमेंट फॅक्टर? वाचा...

कांदा भजी खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा फणसाची भजी, सोपी रेसिपी

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT