yuvraj singh saam tv
Sports

Yuvraj Singh: 'माझ्या भावांना काहीच...', रोहित- विराटला ट्रोल करणाऱ्यांवर युवराज भडकला, म्हणाला..

Yuvraj Singh Came In Support Of Rohit Sharma And Virat Kohli: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने गेल्या काही महिन्यात सुपरफ्लॉप कामगिरी केली आहे. मादेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला व्हॉईटवॉशचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात खेळताना भारतीय संघाला ३-१ ने पराभवाचा सामना करावा लागला.

संघाने फ्लॉप कामगिरी केली, यासह संघातील प्रमुख फलदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा देखील फ्लॉप शो पाहायला मिळाला. दोघेही धावा करण्यात संघर्ष करताना दिसून आले. दरम्यान दोघांनेही टिकेचा सामना करावा लागला. आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग त्यांच्या बचावासाठी पुढे आला आहे.

युवराज सिंगकडून रोहित - विराटचा बचाव

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, युवराज सिंगने भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला की, कुठल्याच संघाने ऑस्ट्रेलियात येऊन सलग २ कसोटी मालिका जिंकल्या नव्हत्या. युवराज म्हणाला, ' लोकं विराट कोहली आणि रोहित शर्मावर जोरदार टीका करत आहेत, पण त्यांनी याआधी संघासाठी काय केलंय हे लोकं विसरुन जातात. ते वर्तमानातील २ दिग्गज खेळाडू आहेत. पराभव होणं हा खेळाचा एक भाग आहे त्याचं वाईट वाटणं साहजिक आहे. पण मला विश्वास आहे की, भारतीय संघ नक्की कमबॅक करेल.'

भारतीय संघात काय बदल करता येतील? या प्रश्नाचं उत्तर देताना, युवराज सिंग म्हणाला की, ' मी हे करु शकत नाही. मी नेहमीच क्रिकेटचा स्टुडेंट म्हणून राहिलोय. रोहित शर्मा, विराट कोहली आणि गौतम गंभीर हे माझ्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळले आहेत.

मला इतकंच म्हणायचं आहे की, जेव्हा एखादा खेळाडू आऊट ऑफ फॉर्म असतो, त्यावेळी त्याच्यावर टीका करणं खूप सोपं असतं. पण त्याला सपोर्ट करणं खूप कठीण असतं.'

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे कुटुंबासारखे असल्याचं युवराज सिंगने सांगितलं. युवराज म्हणाला, ' खेळाडूंनी फ्लॉप कामगिरी केल्यानंतर त्यांना टार्गेट करणं हे मिडीयाचं काम आहे. मात्र आपल्या मित्रांना आणि भावांना सपोर्ट करणं हे आमचं काम आहे. '

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT