kl rahul and sunil gavaskar google
क्रीडा

Sunil Gavaskar Statement: शतकवीर केएल राहुलचं गावसकरांकडून तोंडभरून कौतुक ! म्हणाले, ' हे शतक म्हणजे...'

Ankush Dhavre

Sunil Gavaskar On KL Rahul:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी -२० मालिका संपल्यानंतर आता कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती.

एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात होते. अवघ्या ९२ धावांवर ४ फलंदाज बाद झाले होते. त्यावेळी केएल राहुल फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. त्याने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढत १०१ धावांची संयमी खेळी केली. या खेळीसह त्याने भारतीय संघाचा डाव २४५ धावांवर पोहचवला.

केएल राहुलच्या या शतकी खेळीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देखील त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. (Latest sports updates)

स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करत असताना सुनील गावसकर म्हणाले की, ' मी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्व शतकं नाही पाहिली. मात्र माझ्या कारकिर्दीत मी भारतीय खेळाडूंकडून झळकावण्यात आलेली जितकी शतकं पाहिली आहेत. त्यापैकी हे शतक टॉप १० मध्ये आहे.'

तसेच ते पुढे म्हणाले की, ' दुखापतीतून कमबॅक केल्यानंतर आशिया चषक स्पर्धेपासून त्याचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला आहे. केएल राहुलमध्ये कौशल्याची कमतरता कधीच नव्हती. हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र आशिया चषक स्पर्धेत त्याने यष्टिरक्षक फलंदाज म्हणून जो काही खेळ केला आहे, आपल्याला तोच केएल राहुल पाहायला मिळत आहे जो आपल्याला कित्येक वर्षांपासून पाहायचा होता.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT