sachin tendulkar twitter
क्रीडा

Aman Sehrawat: अमन सेहरावतच्या कामगिरीवर क्रिकेटचा देवही प्रसन्न! कौतुक करणारी पोस्ट शेअर करत म्हणाला...

Sachin Tendulkar Post For Aman Seherawat: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताला सहावं पदक जिंकून देणाऱ्या अमन सेहरावतचं कौतुक केलं आहे. त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

Ankush Dhavre

भारताने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पदकांचा षटकार मारला आहे. भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने ५७ किलोग्रॅम वजनी गटातील कुस्ती प्रकारात भारताला कांस्यपदक जिंकून दिलं आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात त्याने प्युएर्तो रोकोच्या डॅरियन क्रूझला धोबीपछाड देत पराभूत केलं आणि भारताला पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) स्पर्धेतील सहावं आणि या स्पर्धेत कुस्तीतील पहिलंच पदक जिंकून दिलं. यासह तो ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारा सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

सचिन तेंडुलकरनेही केलं कौतुक

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) भारताला ऐतिहासिक पदक जिंकून देणाऱ्या अमन सेहरावतचे कौतुक केलं आहे. त्याने ट्वीट करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला आहे. सचिनने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर त्याने अमन सेहरावतचा कांस्यपदकासोबतचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देत त्याने लिहिले की, ' अमन सेहरावत,वयाच्या २१ वर्षी भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वात युवा खेळाडू म्हणून पदक जिंकल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

हा केवळ तुमचाच विजय नाही, तर संपूर्ण कुस्ती महासंघाचा विजय आहे. तुम्ही मिळवलेल्या यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तुमचे आई- वडील नक्कीच स्वर्गातून पाहत असतील. त्यांना तुमचा अभिमान वाटत असेल.'

अमन सेहरावतला सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात त्याला वर्ल्ड नंबर १ खेळाडूने पराभूत केलं होतं. त्यामुळे त्याची सोनेरी -रुपेरी पदक जिंकण्याची संधी हुकली. मात्र त्याने कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात दमदार खेळ करुन दाखवला आणि भारताला कांस्यपदक जिंकून दिलं. या विजयासह तो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.

१० तासात कमी केलं ४.५ किलो वजन

अमन सेहरावतच्या अडचणीतही वाढ झाली होती. सेमीफायनलचा सामना झाल्यानतंर त्याचं वजन अचानक वाढलं होतं. त्यामुळे त्याला १० तासात ४.५ किलो वजन कमी करायचं होतं. त्यासाठी त्याने रात्रभर मेहनत घेतली. त्याने रात्री १२:३० वाजता जिमच्या दिशेने धाव घेतली. तासभर ट्रेडमिलवर धावला. त्यानंतर सौना बाथ घेतला. मसाज घेतला. हे सगळं करुन त्याने रात्रभरात ४.५ वजन कमी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

India Travel : मित्रांसोबत तुफान मजा करा, हिवाळ्यात 'या' बीचला भेट द्या

Wedding: नवराई माझी लाडाची; शेतकरी पत्नीला नेले थेट हेलिकॉप्टरने घरी

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

SCROLL FOR NEXT