Vinod Kambli Saam Tv
Sports

अरे रे विनोद कांबळीवर काय वेळ आली, धड चालताही येईना, Video पाहून डोळ्यात पाणी येईल

Vinod Kambli : एकेकाळी कोट्यावधी रुपयांची कमाई कमावणारा विनोद कांबळी (Vinod Kambli Health Update) आज एक-एक रुपयाला महाग झाला आहे. इतकेच काय तर परिस्थिती इतकी दयनीय झाली की चालताही येईना.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vinod Kambli Viral Video : भारतीय संघाचा माजी खेळाडी विनोद कांबळीची (Vinod Kambli Health Update) स्थिती अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणाऱ्या कांबळीला आज चालताही येईना. सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulakr) मित्र विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामध्ये त्याला चालताही येत नसल्याचे दिसतेय.

एकेकाळी कोट्यावधी रुपयांची कमाई कमावणारा विनोद कांबळी (Vinod Kambli Health Update) आज एक-एक रुपयाला महाग झाला आहे. इतकेच काय तर परिस्थिती इतकी दयनीय झाली की चालताही येईना. क्रिकेट खेळत असताना चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या कांबळी आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. सचिन तेंडुलकरचा जीवलग मित्र विनोद कांबळीला आज नीट चालताही येत नाही. विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो बाईकचा आधार घेऊन उभा आहे.पण जेव्हा ते चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते अडखळतो. त्यानंतर शेजारी उभे असलेले लोक त्यांना आधार देतात.

विनोद कांबळीला काय झालं ?

विनोद कांबळीला नेमकं काय झालं? याबाबत कोणताही अधिकृत माहिती नाही. पण सोशल मिडिया रिपोर्ट्सनुसार, मागील काही दिवसांपासून विनोद कांबळीची प्रकृती व्यवस्थित नाही. त्याला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होतं. कांबळीला हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्याशिवाय तो नैराश्यानेही ग्रस्त झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओतून त्याची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे दिसतेय. विनोद कांबळीला चालताही येत नसल्याचे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

कठीण परिस्थितीमध्ये सचिनकडून मदत -

विनोद कांबळी आर्थिक संकटात होता, त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्याची मदत केली होती. सचिन तेंडुलकरने विनोद कांबळीला एक अॅकेडमीमध्ये कोच म्हणून नियुक्त केले होते. त्याशिवाय मुंबई टी२० लगीमध्येही त्याला कोच केले होते. पण त्यानंतर त्याची प्रकृती खराब झाली.त्यामुळे नोकरी गमवावी लागली.

विनोद कांबळीचं करिअर -

विनोद कांबळीने टीम इंडियासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 4 शतके, 2 द्विशतके आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने कसोटीत एकूण 1084 धावा केल्या. कांबळीचा कसोटीत स्ट्राईक रेट 59.66 आहे. तर कांबळीने वनडेत 2 शतके आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने 2477 धावा केल्या आहेत. कांबळीचा वनडेमधला स्ट्राईक रेट 71.94 आहे. विनोद कांबळीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 9965 धावांचा पाऊस पाडला, त्याची सरासरी जवळपास ६० इतकी होती. शानदार फलंदाजी करणाऱ्या विनोद कांबळीला क्रिकेटमध्ये दबदबा राखता आला नाही. आज तो एक एक रुपयाला महाग झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT