मुंबई: लहानपण गरिबीत गेलं. राहायला जागा नाही. हलाखीचं जीवन जगत क्रिकेट (Cricket) शिकतो. क्रिकेट खेळण्यासाठीही त्याच्याकडे साहित्यही नसतं. मग आयपीएलमध्ये खेळतो. त्यानंतर टीम इंडियात संधी मिळते. या न अशा अनेक यशोगाथा आपण ऐकल्या किंवा बघितल्या असतील. पण काही दिवसांपूर्वी याच्या उलट असलेली कहाणी आपल्याला ऐकायला मिळाली. होय ही कहाणी आहे विनोद कांबळीची (Vinod Kambli) .
एकेकाळचा भारतीय संघातला स्टार खेळाडू असलेला विनोद कांबळी सध्या कुटुंबाचं उदरनिर्वाह कसं करायचं याच्या विचारात आहे. सध्या तो आर्थिक अडचणींच्या डोगराशी सामना करतोय. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या ३० हजार रुपयांच्या पेन्शनवर सध्या तो स्वतः आणि कुटुंबाचंही पोट भरतोय.
विनोद कांबळीनं अलीकडेच एका मुलाखतीत आपलं दुःख व्यक्त केलं होतं. त्याला नोकरीची किती गरज आहे, हे त्यानं या मुलाखतीद्वारे सांगितलं. सध्या तो आणि त्याचं कुटुंब कठीण काळाशी झगडत आहे. त्याला नोकरीची नितांत गरज आहे, असं त्यानं सांगितलं.
हे देखील पाहा -
कांबळीनं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे नोकरीची मागणी केली होती. विनोद कांबळी हा क्रिकेट इतिहासातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आहे. दोघांनी शालेय जीवनात क्रिकेट खेळताना विक्रम नोंदवले होते. भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना सुरुवातीला विनोद कांबळीनं जबरदस्त कामगिरी केली होती. एकेकाळी त्याच्या लाइफस्टाइलचीही चर्चा व्हायची.
पण हाच विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबतचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तो चर्चेत आला आहे. आता या विनोद कांबळीला नोकरीची ऑफर मिळाल्याचंही वृत्त आहे. महाराष्ट्रातील एका उद्योजकानं त्याला नोकरीची ऑफर दिली आहे. संदीप थोरात यांनी त्याला १ लाख रुपये महिना पगाराच्या नोकरीची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. ही नोकरी क्रिकेटशी संबंधित नाही. मुंबईतील सह्याद्री उद्योग समूहाच्या अर्थ विभागात त्याला नोकरीची ऑफर देऊ केली आहे.
विनोद कांबळी हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगात एक हजार धावा करणारा फलंदाज आहे. त्याने सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा एक इनिंग जास्त खेळून हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विनोद कांबळीला नोकरीची ऑफर दिली असली तरी, त्याने अद्याप यावर उत्तर दिलेलं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.