WPL 2023  Saam tv
Sports

WPL 2023: WPL च्या पहिल्याच सामन्यात परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान! व्हिडिओ होतोय व्हायरल

सामना सुरू होण्यापूर्वी मैदानात असं काही घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

WPL 2023 Viral Video: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली हे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुध्द गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात मुंबई संघाने जोरदार कामगिरी करत १४३ धावांनी विजय मिळवला. हा सामना तर रोमांचक ठरला मात्र सामना सुरू होण्यापूर्वी मैदानात असं काही घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Latest sports updates)

गुजरातची कर्णधार बेथ मुनी आणि मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर नाणेफेक करण्यासाठी मैदानावर आले. बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पहिला सामना पहिलेच हंगाम असल्यामुळे या स्पर्धेची जोरदार ओपनिंग सेरेमनी पाहायला मिळाली.

मात्र सामना सुरू होण्यापूर्वी जेव्हा दोन्ही संघातील खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले, त्यावेळी अनुचित घटना घडली. राष्ट्रगीत ज्यावेळी सुरू असतं त्यावेळी सर्वच सावधान पोझिशनमध्ये असतात.

मात्र गुजरात जायंट्स संघाची एक खेळाडू राष्ट्रगीत सुरू असताना हात मळताना दिसून आली. राष्ट्रगीत सुरू असताना असं काही करणं हा राष्ट्रगीताचा अपमान मानला जातो.

या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई संघाने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हेली मॅथ्यूजने ४७ धावांची तुफानी खेळ केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने १४ चौकारांच्या साहाय्याने ६५ धावा कुटल्या. हे विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील पहिले अर्धशतक ठरले.

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार बेथ मुनी पहिल्याच चेंडूवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT