FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कपमध्ये २०२२ मध्ये उलटफेरीचं सत्र सुरूच आहे. गुरूवारी ग्रुप-एफ मधील दोन दिग्गज संघ क्रोएशिया आणि बेल्जियम यांच्यात थरारक सामन्यात झाला. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर जगातील नंबर-2 संघ असलेला बेल्जियम फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर फेकला गेला आहे. तर क्रोएशिया संघाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. (Latest Marathi News)
गेल्या फिफा विश्वचषकात बेल्जियमचा संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्यांना उपांत्यपूर्व फेरीतही मजल मारता आली नाही. बेल्झियमसाठी आजचा सामना अटीतटीचा सामना होता. बेल्जियमला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवणं आवश्यक होतं. (FIFA World Cup 2022)
सामन्याच्या ६०व्या मिनिटाला बेल्जियमच्या खेळाडूंनी चांगली चाल रचली, पण त्यांना गोल करता आला नाही. अखेर, हा सामना बरोबरीत सुटला आणि बेल्जियम स्पर्धेबाहेर फेकला गेला. दुसरीकडे क्रोएशियाला पुढील फेरीत जाण्यासाठी फक्त पराभव टाळण्याची गरज होती. सामना बरोबरीत सुटल्याने त्यांनी प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय.
मोरोक्कोचा २-१ कॅनडावर विजय
दुसरीकडे ग्रुप एफ मधील दुसऱ्या सामन्यात मोरोक्कोने कॅनडाचा २-१ असा पराभव केला. या विजयासह मोरक्कन संघाने बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. १९८६ नंतर तो प्रथमच उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. मोरोक्कोला पुढे जाण्यासाठी या सामन्यात विजय किंवा ड्रॉ आवश्यक होता. मात्र, त्यांना हा सामना २-१ ने जिंकला. त्यामुळे मोरोक्कोने सुद्धा प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.