viral cricket video youtube
Sports

Viral Catch Video: भावानं नाद केला पण वाया नाही गेला! ४ वेळा कॅच सुटला, पण पाचव्यांदा पकडलाच - VIDEO

Viral Tennis Cricket Video: नुकताच एका भन्नाट झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Viral Cricket Video: सोशल मीडियावर क्रिकेटचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच आता टेनिस क्रिकेटमधील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात.

नुकताच एका भन्नाट झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. जो पाहून तुम्हीही क्षेत्ररक्षकाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

तुम्ही आजवर अनेक क्षेत्ररक्षकांना पाहिलं असेल जे भन्नाट डाइव्ह मारुन झेल टिपतात. तर काही क्षेत्ररक्षक हे लांबच लांब उडी मारुन झेल टिपत असतात. टेनिस क्रिकेटमधील असाच एक क्षेत्ररक्षक आहे, ज्याने चक्क जगलिंग करत झेल टिपला आहे.

तर झाले असे की, उजव्या हाताच्या गोलंदाजाने डाव्या हाताच्या फलंदाजाला बॅटच्या खाली बॉल टाकला. हा बॉल फलंदाजाने मैदानाच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र अंदाज चुकला आणि फटका फसला. बॉल थेट हवेत गेला. त्यावेळी मिडविकेटचा क्षेत्ररक्षक धावत आला आणि झेल टिपला.

मात्र हा झेल दिसतोय तितका सोपा नव्हता. हा झेल पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदाही हुकला. मात्र पठ्ठ्याने पाचव्यांदा झेल टिपला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

टेनिस क्रिकेटची वाढती लोकप्रियता ..

टेनिस क्रिकेटची लोकप्रियता ही प्रचंड वाढली आहे. यापूर्वी टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन खुप कमी प्रमाणात केलं जायचं. मात्र आता गावागावात आणि मोठ मोठ्या शहरांमध्ये देखील या स्पर्धाचे आयोजन केले जाते.

या स्पर्धांमध्ये बक्षिसाची रक्कम लाखांमध्ये असते. या स्पर्धांमध्ये चमकणारे काही खेळाडू आता परदेशात जाऊन देखील खेळत आहेत. तसेच काही खेळाडूंना राज्याच्या संघात खेळण्याची देखील संधी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT