rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Viral Video: लाईव्ह सामन्यात फॅन मैदानात घुसला, रोहितला मिठी मारली अन् मग पुढे... पाहा VIDEO

Fan Invaded To Meet Rohit Sharma: मुंबई आणि जम्मू- काश्मीर या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळालाआहे.

Ankush Dhavre

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीत भारतीय संघातील स्टार खेळाडू देखील मैदानात खेळण्यासाठी उतरले आहेत. दरम्यान मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर यांच्यातील सामना मुंबईतील बीकेसीत सुरु आहे.

या सामन्यात मुंबईचा संघ पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान सामना सुरु असतानाच एका फॅनने मैदानात घूसून रोहितला मिठी मारली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा देखील रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळतोय हे पाहून हजारो फॅन्स रोहितला खेळताना पाहण्यासाठी मैदानात आले होते. दरम्यान मुंबईचं क्षेत्ररक्षण सुरु असताना एका फॅनने सुरक्षारक्षकांना चकवा देत मैदानात प्रवेश केला

फॅनने मैदानात प्रवेश करत धावत धावत रोहितच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी रोहित मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. सुरक्षारक्षकांनी त्या फॅनला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याला थांबवू शकले नाहीत. शेवटी सुरत्रारक्षकांनी त्याला थांबवलं आणि बाहेर घेऊन गेले.

मुंबईचा घरच्या मैदानावर पराभव

हा सामना मुंबईच्या होम ग्राऊंडवर पार पडला. मात्र या सामन्यात मुंबईला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईला १२० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या जम्मू आणि काश्मीरने २०६ धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मुंबईने २९० धावा केल्या. मुंबईने २०५ धावांचं आव्हान ठेवलं . हे आव्हान जम्मू आणि काश्मीरने ५ गडी राखून पूर्ण करत विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT