virat kohli anushka sharma premanand maharaj  Saam Tv
Sports

Virat Kohli: विराट कोहली ५ कोटी घेऊन प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला गेला? खळबळजनक सत्य आले समोर

Virat Kohli latest news : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीला ५ कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आला होता.

Namdeo Kumbhar

Virat Kohli 5 crore Premanand Maharaj claim : प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ५ कोटी रुपये घेतल्याचा, असा गंभीर दावा फलाहारी बाबा दिनेश शर्मा यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. पण यावर आता विराट कोहलीकडून स्पष्टीकरण आले आहे. (Virat Kohli team statement on 5 crore allegation)

फलाहारी बाबाचे हे आरोप विराट कोहलीच्या टीमकडून हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ५ कोटींचा केलेला दावा पूर्णपणे खोटा, निराधार आणि बदनामी करणारे आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे केवळ स्वतःच्या श्रद्धेने आणि आस्थेने प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी वृंदावनला जातात. यात कसलाही पैशांचा व्यवहार झालेला नाही. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही कोहलीच्या टीमकडून देण्यात आला आहे. (Anushka Sharma Premanand Maharaj, Virat Kohli statement)

नेमका दावा काय होता?

प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात आमंत्रित करण्यासाठी विराट कोहलीला ५ कोटी रुपये देण्यात आले होते असा दावा करण्यात आला होता. पण आश्रमाशी संबंधित एका शिष्याने हा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. आता विराट कोहलीच्या टीमकडूनही फलाहरी महाराज दिनेश शर्मा यांचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे.

विराट कोहलीच्या टीमने जारी केलेल्या या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणातील सर्व चर्चांना आणि अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. अशा कोणत्याही खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवण्यापूर्वी मीडियाने सत्य तपासून घ्यावे, असे आवाहनही कोहलीकडून कऱण्यात आले आहे.

"विराट कोहलीच्या बाबत फलाहरी महाराज दिनेश शर्मा यांनी केलेले सर्व दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत," असे स्पष्टीकरण विराट कोहलीच्या टीमकडून अधिकृत निवेदनाद्वारे दिले आहे. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी अनेकदा वृंदावनमध्ये जाऊन प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले आहे. या भेटींचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते. विराट केवळ आपल्या गाढ श्रद्धेपोटी आणि भक्तीभावाने प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला जातो. त्यामुळे या धार्मिक भेटींचा संबंध इतर कोणत्याही खोट्या दाव्यांशी जोडला जाऊ नये, असे कोहलीच्या टीमने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत सर्वोच्च तापमानाची नोंद, ३७ वर्षानंतर ३९.६ अंश तापमान

PM Narendra Modi : "आपण करून दाखवू...." २०४७ पर्यंत भारताला विकसित देश घडवण्याचे स्वप्न; पंतप्रधान मोदींची नवीन घोषणा

OTT TOP 5 MOVIES : हॉलिवूडलाही मात देतील 'हे' ५ चित्रपट; शेवटचा ट्विस्ट पाहून थक्क व्हाल

RBI Repo Rate: रेपो रेट वाढला, आता तुमच्या EMI वर परिणाम होणार; होम- कार अन् पर्सनल लोनमध्ये काय बदल झाला?

Garba Painjan Designs : नवरात्रीत घागरा-चोळीवर खुलून दिसतील पैंजणाच्या 'या' ७ ट्रेंडी डिझाइन्स, तुमच्यावरून कुणाची नजर हटणार नाही!

SCROLL FOR NEXT