Team India Points Table Saam Tv (Social Media)
Sports

World Cup Point Table: इंग्लंडच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा; पोहोचली गुणतालिकेच्या टॉप ४ वर

ODI World Cup 2023 Point Table: पहिला सामना जिंकूनही भारतीय संघ एकदिवसीय वर्ल्डकपच्या गुणतालिकेत तळाशी होता.

Bharat Jadhav

ICC ODI World Cup 2023 Points Table :

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये अनेक मनोरंजक सामने होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्याविरुद्धात होता. टीम इंडिया वर्ल्डकपची सुरुवात विजयानं केली आहे. आता भारतीय संघ उद्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानच्या संघाविरुद्धात दोन हात करेल. (Latest News)

दरम्यान पहिला सामना जिंकूनही भारतीय संघ एकदिवसीय वर्ल्डकपच्या गुणतालिकेत तळाशी होता. आज इंग्लंडने बांगलादेशचा पराभव केला. यामुळे दोन जणांना फायदे झाले एक टीम इंडियाला दुसरा अर्थात इंग्लंडच्या संघाला. कारण इंग्लंडचा रन रेट खूपच कमी होता, त्यात सुधारणा झाली. तर टीम इंडियाने थेट टॉप ४ मध्ये प्रवेश केलाय. म्हणजे इंग्लंडच्या विजयाचा फायदा भारतीय संघाला झाला.

इंग्लंड आणि बांगलादेशच्या सामन्यापूर्वी गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ चार गुणांसह पहिल्या क्रमांकावर होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. तर उत्तम धावगतीमुळ पाकिस्तानचा संघ दोन गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. याचबरोबर बांगलादेश संघाचेही एका सामन्यात दोन गुण होते. तसेच निव्वळ धावगतीही भारतीय संघापेक्षा चांगली होती. त्यामुळे संघ चौथ्या क्रमांकावर होता. आता मात्र गुणतालिकेचं चित्र पलटले आहे.

नवीन गुणतालिकेनुसार, पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे. या संघाकडे चार गुण आहेत. संघाचा निव्वळ रन रेटही खूप चांगला आहे. दुसऱ्या नंबरवर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. या संघाकडे दोन गुण आहेत. पाकिस्तानचा संघ दोन गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, भारतीय संघ आता दोन गुणांसह चौथ्या क्रमांकावर आलाय. चौथ्या क्रमांकावर असलेला बांगलादेश संघ आता थेट सहाव्या क्रमांकावर पोहोचलाय. तर इंग्लंडचा संघ पाचव्या क्रमांकावर आलाय.

पाकिस्तान जिंकली तर काय होईल

आता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे. हा सामना कोणताही संघ जिंकला तरी गुणतालिकेत पुन्हा बदल होईल. जर पाकिस्तानचा संघ जिंकला तर पाक संघ थेट दुसऱ्या क्रमांकावर जाईल. तर श्रीलंकेचा संघ जिंकला तर त्याचा या वर्ल्डकपमधील त्याचा पहिला विजय असेल. जर श्रीलंका जिंकली आणि उद्या म्हणजेच बुधवारी टीम इंडिया जिंकली तर भारतीय संघ थेट चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर जाईल. उपांत्य फेरीच्या अगदी जवळ जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT