england  twitter
Sports

ENG vs WI, 2nd Test: इंग्लंडचं 'बॅझबॉल' जोमात! पहिल्याच दिवशी चोपल्या 416 धावा, पाहा सर्वाधिक धावा करणारे 10 संघ

England vs West Indies, 2nd Test: वेस्टइंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लिश फलंदाजांचा हल्लाबोल पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

इंग्लंड आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना नॉटींगहॅमच्या ट्रेंटब्रिजमध्ये सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश फलंदाजांनी बॅझबॉल स्टाईलने वेस्टइंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. बेन स्टोक्सच्या नेतृ्त्वाखाली खेळणाऱ्या संघाने पहिल्याच दिवशी ८८.३ षटकात ४१६ धावा चोपल्या. इंग्लंडकडून फलंदाजी करताना ओली पोपने सर्वाधिक १२१ धावा चोपल्या. तर डकेटने ७१ धावा केल्या.

घरच्या मैदानावर खेळताना इंग्लंडच्या फलंदाजांनी वेस्टइंडिजच्या गोलंदाजांना बॅझबॉल स्टाइल दणका दिला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना पोपने १२१ धावा केल्या. तर बेन स्टोक्सने ६९ धावा चोपल्या. तर जेमी स्थिथ आणि हॅरी ब्रुकने ३६-३६ धावा केल्या. इंग्लंडने पहिल्याच दिवशी फलंदाजी करताना ४१६ धावा चोपल्या असल्या तरीदेखील या संघाला टॉप १० मध्ये प्रवेश करता आलेला नाही.

पाहा पहिल्याच दिवशी सर्वात मोठी धावसंख्या उभारणारे संघ

इंग्लंड विरुद्ध भारत - ५८८ धावा, २५ जुलै, १९३६

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ५२२ धावा, २८ जून १९२४

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - ५०९ धावा, २१ जुलै २००२

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५०८ धावा, १७ ऑगस्ट, १९३५

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड- ५०६ धावा, १ डिसेंबर २०२२

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान - ४९६ धावा, १ जुलै १९५४

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ४९४ धावा- ९ डिसेंबर १९१०

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ४९२ धावा- १७ ऑगस्ट, १९३५

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड- ४९१ धावा, ११ जून १९४९

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत- ४८२ धावा, २ जानेवारी २०००

या डावात इंग्लंडचे फलंदाज चमकले. तर वेस्टइंडिजच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर अल्जारी जोसेफने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर केविन सिंक्लेयर आणि केवम हॉजने प्रत्येकी २ गडी बाद केले. शोएब बशीरच्या रुपात इंग्लंडचा शेवटचा विकेट पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT