eng vs sa saam tv news
Sports

ENG vs SA, Paying XI: इंग्लंडसाठी गुड न्यूज! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी धडाकेबाज खेळाडू करतोय कमबॅक

England vs South Africa Playing 11: या सामन्यासाठी इंग्लंडचा दिग्गज खेळाडू कमबॅक करतोय.

Ankush Dhavre

England vs South Africa Playing 11:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आज बलाढ्य इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आमने सामने येणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण दोन्ही संघांसोबत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या सामन्यात इंग्लंडला अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला.

तर दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडने धूळ चारली आहे. त्यामुळे हा पराभव विसरून दोन्ही संघ जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

बेन स्टोक्ससारखा मॅचविनर खेळाडू प्लेइंग ११ मध्ये नसणं ही इंग्लंडसाठी चिंताजनक बाब आहे. मात्र अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर बेन स्टोक्सला संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Latest sports updates)

तसेच मुख्य प्रशिक्षकाने देखील बेन स्टोक्सला संघात स्थान देण्याबाबत भाष्य केलं होतं. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात बेन स्टोक्सला इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं जवळ जवळ निश्चित आहे. बेन स्टोक्सचं कमबॅक झाल्यास लियाम लिविंगस्टनला बाहेर बसावं लागू शतकं. तसेच गुस एटकिन्सनच्या जागी ख्रिस वोक्सला संधी दिली जाऊ शकते.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

या सामन्यासाठी अशी असू शकते इंग्लंड संघाची प्लेइंग ११:

जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार, यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, ख्रिस वोक्स/गुस एटकिन्सन, डेविड विली, आदिल रशिद, मार्क वूड, रीस टॉप्ली.

या सामन्यासाठी अशी असू शकते दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११:

क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), तेंबा बावूमा (कर्णधार), रासी वान डेर डूसेन, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, मार्को यान्सेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, तबरेज शम्सी/जेराल्ड कोएत्जी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

SCROLL FOR NEXT