England vs Australia Ashes 2023: सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील अंतिम कसोटी सामना केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. हा सामना स्टुअर्ट ब्रॉडच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे. हा सामना संपताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.
ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेत स्टुअर्ट ब्रॉडने आतापर्यंत २० गडी बाद केले आहेत. जाणून घ्या कशी राहिली त्याची कसोटी कारकीर्द.
स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी कारकीर्द..
स्टुअर्ट ब्रॉडने २००७ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो श्रीलंका संघाविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. आतापर्यंत १६७ कसोटी सामन्यांमध्ये त्याने २७.६४ च्या सरासरीने आणि २.९८ च्या इकॉनॉमी रेटने ६०२ गडी बाद केले आहेत.
त्याने २० वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. तर ३ वेळेस १० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. तर फलंदाजी करताना त्याने २४३ इनिंग्समध्ये ३६५६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.
स्टुअर्ट ब्रॉडचा प्रवास..
स्टुअर्ट ब्रॉडचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्याला आपल्या कारकीर्दीत अनेक चढ उतार पाहायला मिळाले आहेत. मात्र त्याने माघार घेतली नाही. डिसेंबर २००७ रोजी तो आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. श्रीलंकेविरुध्द झालेल्या या सामन्यापूर्वी स्टुअर्ट ब्रॉडची ओळख म्हणजे युवराज सिंगसमोर ६ षटकार खाणारा गोलंदाज अशी होती.
आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर एकाच षटकात सलग ६ षटकार मारले होते. असं सर्व असताना देखील त्याने आपल्या गोलंदाजीत सुधारणा केली. कसोटी क्रिकेटवर अधिक भर देण्यासाठी त्याने २०१४ नंतर टी -२० आणि २०१६ नंतर वनडे क्रिकेट खेळणं सोडून दिलं होतं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.