Star Cricketer Injured Saam tv
Sports

Star Cricketer Injury : डोळा काळानिळा पडलाय, गालाला खरचटलं, नाकाला मार; स्टार क्रिकेटपटू गंभीर जखमी

Star Cricketer Injured : स्टार क्रिकेटपटू गंभीर जखमी झाला आहे. डोळा काळानिळा झालाय, गालाला खरचटलं

Vishal Gangurde

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टॉक्स गंभीर जखमी झालाय

क्रिकेट बॉल चेहऱ्यावर लागल्याने बेनचा डोळा काळानिळा पडलाय

त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांना माहिती दिली

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टॉक्सने त्याच्या खेळामुळे जगातील क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जीवावर त्याने इंग्लंडला अनेक सामने जिंकून दिले आहेत. कर्णधार बेन स्टॉक्स आता जखमी झाल्याने चर्चेत आला आहे. बेन स्टॉक्स गंभीर जखमी झाला आहे. त्याला ओळखणे देखील अवघड झालं आहे. त्याने स्वत: इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकून चाहत्यांना माहिती दिली आहे.

बेन स्टॉक्सने इन्स्टाग्राम स्टोरीला एक कॅप्शन देखील दिलं आहे. 'तुम्ही क्रिकेट बॉल देखील बघितला पाहिजे', असे त्याने म्हटलं आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, तो गंभीर जखमी झाला आहे. त्याचा डोळा काळानिळा झाला आहे. त्याच्या गालाला खरचटलं आहे. नाकाला देखील मार लागला आहे. त्याचा डोळा थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. बॉल थोडा वर असता तर त्याचे क्रिकेट करिअर धोक्यात आलं असतं.

बेन स्टॉक्स गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे. बेन याआधी देखील जखमी झाला आहे. त्याने रागाच्या भरातही स्वत:ला जखमी करून घेतले आहे. २०१४ साली वेस्ट इंडिज दौऱ्यात शून्यावर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुमच्या लॉकरवर बुक्का मारला होता. यात त्याने उजव्या हाताचं मनगट मोडून घेतलं होतं. त्यामुळे त्याला तीन महिने तुरुंगाबाहेर राहावं लागलं होतं. जखमी झाल्याने २०१४ साली आयोजित करण्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळू शकला नव्हता.

पुढे २०२१ साली बोटाला दुखापत झाल्याने त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. तर २०२३-२४ साली त्याच्या डाव्या हाताच्या स्नायूला दुखापत झाली होती. त्यानंतर २०२५ साली पुन्हा तीच दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. त्यावेळी तब्बल तीन महिने मैदानाबाहेर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT