इंग्लंडनं पहिल्याच कसोटीत पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला. लीड्स येथे पहिला कसोटी सामना झाला. त्यात इंग्लंडनं पाकिस्तानला एक डाव आणि १०३ धावांनी धूळ चारली. लीड्सच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानचा संघ डावाच्या फरकाने पराभूत झाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये पाकिस्तानला इंग्लंडनं एक डाव आणि ५५ धावांनी मात दिली होती.
पहिल्या कसोटीच्या अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानचा संघ दुसऱ्यांदा ऑलआऊट झाला. त्यांनी दुसऱ्या डावात अवघ्या १३५ केल्या. पाकिस्तानच्या फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात मोहम्मद रिझवान यानं सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून ओली रॉबिन्शन आणि जोश टंग यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली.
पाकिस्तानच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. दोन्ही डावांत फलंदाज धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसून आले. दुसऱ्या डावात पाकिस्तानचे ७ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. पाकिस्तानला दुसऱ्याच षटकात इमाम उल हकच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्याला खातेही उघडता आले नाही. जोफ्रा आर्चरने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर सलामीवीर अझान अवैस देखील फार वेळ मैदानावर तग धरू शकला नाही. १४ चेंडूंत ९ धावा करून तो जोफ्राकरवी बाद झाला.
पहिल्या डावात स्टार फलंदाज अब्दुल्ला शपिक यानं अर्धशतकी खेळी केली होती. पण दुसऱ्या डावात त्याला फक्त १५ धावाच करता आल्या. सऊद शकील यानं १४ धावा, तर शान मसूदने २९ धावांची खेळी करून माघारी परतला. कर्णधार सलमान अली आगा यानं अवघ्या ४ धावा केल्या. अली उस्मान ७ धावा आणि खुर्रम शहजादने आठ धावा केल्या.
पहिल्या डावात जोश टंग यानं पाच गडी गारद केले. ओली रॉबिन्शन यानंही पाच गडी बाद केले. त्यांच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानी फलंदाजांनी अक्षरशः नांगी टेकली. पाकिस्तानला १७१ धावाच करता आल्या. तर इंग्लंडनं पहिल्या डावात सर्वबाद ४०९ धावा केल्या. इंग्लंडला २३८ धावांची आघाडी मिळाली. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात १३५ धावाच करू शकला. एक डाव आणि १०३ धावांनी पाकिस्ताननं पहिला कसोटी सामना गमावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.