England test team announce against india saam tv
Sports

India vs England : भारताविरुद्ध इंग्लंडनं टाकला मोठा डाव; दुसऱ्या कसोटीसाठी संघात खतरनाक गोलंदाजाची एन्ट्री

England Announce squad for 2nd Test : पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभूत करणाऱ्या इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. तेजतर्रार आणि भारतासाठी डोकेदुखी समजला जाणारा गोलंदाज जोफ्रा आर्चरचा संघात समावेश केला आहे.

Nandkumar Joshi

पहिल्या कसोटीत पाच शतकं करणारे युवा फलंदाज आणि पाच विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहचं आव्हान मोडून काढत भारताला पराभूत करणाऱ्या इंग्लंडनं दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघानं भारतीय संघासाठी नेहमीच डोकेदुखी ठरणारं 'अस्त्र' त्यांनी बाहेर काढलं आहे. तेजतर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान दिलं आहे. तब्बल चार वर्षांनी आर्चरचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.

इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ जाहीर

इंग्लंड आणि भारत या दोन बलाढ्य संघांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं भारताला पराभूत केलं. चार दिवसांपर्यंत आघाडी मिळवणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या दिवशी इंग्लंडनं सरस खेळ करून पराभूत केलं. आता या दोन संघांमध्ये दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून बर्मिंघममध्ये सुरू होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघानं १५ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.

१५० च्या स्पीडनं गोलंदाजी करणारा आर्चर परतला

इंग्लंडनं १५० हून अधिक किलोमीटर प्रतितास वेगानं गोलंदाजी करणाऱ्या जोफ्रा आर्चरला संघात स्थान दिलं आहे. तब्बल चार वर्षांनी त्यानं इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. आर्चरनं याच आठवड्याच्या सुरुवातीला तब्बल चार वर्षांनंतर लाल चेंडूने गोलंदाजी केली. चेस्टर ले स्ट्रीटमध्ये डरहमविरुद्ध चार दिवसांच्या सामन्यात ससेक्सकडून तो मैदानात उतरला. त्यानं उत्कृष्ट कामगिरी करत संघ निवड करणाऱ्यांना प्रभावित केलं. आर्चरने या सामन्यात फलंदाजी करताना ३१ धावा चोपल्या. तर १८ षटकं फेकली. त्यात ३२ धावा देत एक विकेटही घेतला.

इंग्लंडची ताकद वाढणार

अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध मार्क वुड आणि जोफ्रा आर्चरशिवाय मैदानात उतरला होता. त्यामुळं त्यांची गोलंदाजी कमकुवत दिसून आली. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळं चार वर्षे प्रथम श्रेणीचे सामने खेळू शकला नव्हता. आर्चर २०२१ पासून इंग्लंडसाठी केवळ वनडे आणि टी २० क्रिकेट संघात खेळला होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानंही जोफ्राच्या कमबॅकबाबत संकेत दिले होते. आर्चरला कसोटी संघातूनही खेळायचे आहे, असे स्टोक्सनं सांगितले होते.

पाच शतकं करूनही भारत पराभूत

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात झाली. नव्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्राच्या सुरुवातीच्या सामन्यातच भारतीय संघानं कच खाल्ली. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात एकूण सात शतकं झळकावली गेली. त्यापैकी पाच शतकं ही भारतीय फलंदाजांनी केली होती.

इंग्लंड संघ -

बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्से, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT