viral cricket video twitter
Sports

Viral Catch Video: एका हातात ड्रिंक, दुसऱ्या हाताने कॅच! इंग्लंडच्या फॅनचा स्वॅग पाहून कोचही चक्रावले- पाहा VIDEO

ENG vs SL 1st Test, Viral Catch Video: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान एका फॅनने एका हाताने भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

इंग्लंड आणि कसोटी क्रिकेट यांचं खूप जूनं नातं आहे. जगभरात टी-२० क्रिकेटचा क्रेझ वाढतोय, तर दुसरीकडे इंग्लंडच्या फॅन्सचं कसोटी क्रिकेटप्रती असलेलं आकर्षण आणखी वाढत चाललं आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामना पाहण्यासाठी फॅन्सने तुफान गर्दी केली. दरम्यान एका फॅनने एका हाताने टिपलेल्या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. त्यावेळी ८३ वे षटक सुरु होते. हे षटक टाकण्यासाठी असिथा फर्नांडो गोलंदाजीला आला होता. त्यावेळी मार्क वुड फलंदाजी करत होता. असिथाने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूवर वुडने जोरात बॅट फिरवली आणि चेंडू बॅटला लागताच थेट डिप मिडविकेटच्या दिशेने सीमारेषेबाहेर गेला.

त्यावेळी स्टँड्समध्ये असलेल्या एका फॅनने एका हाताने शानदार झेल टिपला. एका हातात ड्रिंक तर दुसऱ्या हातात झेल, हे दृष्य पाहून ड्रेसिंग रुममध्ये असलेले इंग्लंडचे कोचही आश्चर्यचकीत झाले.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव २३६ धावांवर आटोपला.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाचा डाव ३५८ धावांवर आटोपला. इंग्लंडचा डावही गडगडला होता. मात्र जेमी स्मिथने शानदार शतकी खेळी केली आणि इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहचवलं. त्याने १४८ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने १११ धावांची खेळी केली.

यासह तो इंग्लंड संघासाठी खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा यष्टीरक्षक ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड लेस एम्सच्या नावावर होता. हा रेकॉर्ड १९३० मध्ये बनवला गेला होता. आता तब्बल ९३ वर्षांनंतर हा रेकॉर्ड मोडला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT