England vs Australia Cricket Match:
विश्वचषकात सुरुवातीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलेल्या ऑस्ट्रेलियाने धमाकेदार कमबॅक केलंय. ऑस्ट्रेलिया संघाला पुन्हा एकदा विजयाचा सूर गवसला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २५३ धावांवर ढेपाळला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल ३३ धावांनी विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात विजय मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४९.३ षटकात सर्व गडी गमावून २८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली.
डावाच्या पहिल्याच चेंडूत मिचेल स्टार्कने जॉनी बेयरस्टोला तंबूत धाडलं. बेयरस्टो शून्यावर बाद झाला. जो रुटही फारशी कमाल करू शकला नाही. जो रुट १७ चेंडूत १३ धावांवर बाद झाला.
दोघे बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि डेव्हिड मलानने इंग्लंडचा डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी ८६ धावांची भागीदारी रचली. मात्र, त्यानंतर डेव्हिड मलानने ६४ चेंडूत ५० धावा करून बाद झाला. डेव्हिडनंतर बेन स्टोक्स ९० चेंडूत ६४ धावा करून तंबूत परतला. स्टोक्स बाद झाल्याने इंग्लंडच्या चाहत्यांच्या जिंकण्याच्या आशा मावळल्या.
लिव्हिंगस्टोन दोन धावांवर बाद झाला तर डेव्हिड व्हिलीने संघासाठी केवळ १५ धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या फलंदाजांना २५३ धावांवर रोखलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा ३३ धावांनी विजय झाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करताना ४९.३ षटकात २८६ धावा केल्या. तर इंग्लंडकडून क्रिसने चार गडी बाद केले. तर आदिल राशिद आणि मार्क वुडने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. मार्शनने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ७१ धावसंख्या ठोकल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.