Dinesh Kartik- Deepika Pallikal Saam TV
Sports

नवरा दमदार क्रिकेटर, बायकोही राष्ट्रीय खेळाडू; कोण आहे हे खेळाडू कपल!

नवरा बायको वेगवेगळे खेळ खेळत असल्याने त्यांच्या कामगिरीबद्दलच्या गोष्टीही वेगळ्या आहेत.

वृत्तसंस्था

नवरा क्रिकेटमधला सर्वोत्तम मॅच फिनिशर तर पत्नी स्क्वॉशमध्ये चॅम्पियन आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये नवऱ्याची चर्चा आहे, तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पत्नीची चर्चा. आता तुम्ही म्हणाला हे भारतीय खेळाशी जोडलेले हे अद्भुत कपल आहे तरी कोण? तुम्‍हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कोणाबद्दल बोलतोय. दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) आणि त्याची पत्नी दीपिका पल्‍लि कलबद्दल बोलत आहोत. दोघेही आपापल्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. खेळाच्या बाबतीत या खेळाडू दाम्पत्यासाठी नवीन वर्ष दमदार जाणार आहे. दिनेश आणि दिपीका 6 महिन्यांपूर्वीच पालक झाले आहेत.

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांच्या प्रेमाचे अनेक किस्से सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे इथे आपण त्याबद्दल बोलणारही नाही. आपण फक्त त्यांच्या खेळाबद्दल आणि कामगिरीबद्दल बोलू, ज्याबद्दल ही जोडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण, त्याआधी आम्ही तुम्हाला सांगतो की, कार्तिकची पत्नी दीपिका अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला, एकाचे नाव कबीर आणि दुसऱ्याचे जियान आहे.

स्क्वॅशमध्ये दीपिका पल्लीकल

नवरा बायको वेगवेगळे खेळ खेळत असल्याने त्यांच्या कामगिरीबद्दलच्या गोष्टीही वेगळ्या आहेत. तर सर्वप्रथम, मिसेस कार्तिक म्हणजेच दीपिका पल्लीकल, जिने तब्बल ४ वर्षांनी पुनरागमन केले आहे. मात्र, तिचा खेळ पाहता तिने तो जिथून सोडला तिथून सुरु केल्याचे दिसते आहे. आई झाल्यानंतर महिला खेळाडूसाठी जागतिक मंचावर कामगिरी करणे तितके सोपे नसते, पण दीपिका पल्लीकल चॅम्पियन म्हणून ते दाखवून देत आहे. WSF जागतिक दुहेरी चॅम्पियनशिपमध्ये, तिने जोशन चिनप्पासह स्क्वॉशच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. मिश्र दुहेरीत ती सौरव घोषालसह चॅम्पियन ठरली. दीपिकाने यासाठी जोरदार तयारी केल्यामुळे हे करणे शक्य झाले.

CWG दीपिकाचे मुख्य लक्ष्य

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुलाच्या जन्मानंतर, दीपिकाने डिसेंबरपासूनच चेन्नईतील ISA येथे चिनप्पा आणि घोषाल यांच्यासोबत प्रशिक्षण सुरू केले. त्या प्रशिक्षणाचा परिणाम म्हणून ती जागतिक स्पर्धा जिंकण्यात यशस्वी झाली. मात्र, ती एवढ्यावरचं थांबणार नाही. या दोन विजयांमुळे आपण आनंदी असल्याचे तिने सांगितले, कारण त्यामुळे आपले मुख्य ध्येय असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीला चालना मिळाली आहे.

आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तीकचे वर्चस्व

आता दीपिका पल्लीकलच्या नवऱ्याच्या म्हणजेच दिनेश कार्तिकच्या कामगिरीबद्दल बोलूया. डीके बॉसने त्याच्या मॅच फिनिशिंग कौशल्याने आयपीएल 2022 वर वर्चस्व गाजवले आहे. तो फिनिशर नंबर वन म्हणून उदयास आला आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. आरसीबीकडून खेळलेल्या 4 सामन्यात त्याने आउट न होता 97 धावा केल्या आहेत. आरसीबीने त्यांचे 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि त्या सर्व सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने मॅच फिनिशिंग कौशल्य दाखवले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT