इम्रान खान यांच्या नावावर नवा रेकॉर्ड; 'असे' करणारे पहिले पंतप्रधान

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे अध्यक्ष शाहबाज शरीफ हे त्यांचे उमेदवार असतील असे संयुक्त विरोधी पक्षाने आधीच जाहीर केले होते.
Imran Khan
Imran KhanSaam TV

पाकिस्तानच्या संसदेमध्ये शनिवारी रात्री पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावावर झालेल्या मतदानात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. देशाच्या इतिहासात अविश्वास ठरावाद्वारे (No Confidence Motion) हटवले जाणारे इम्रान खान हे पहिले पंतप्रधान ठरले. 69 वर्षीय खान मतदानाच्या वेळी कनिष्ठ सभागृहात उपस्थित नव्हते आणि त्यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे खासदारही उपस्थित नव्हते. मात्र, पीटीआयचे बंडखोर सदस्य सभागृहात उपस्थित राहिले. खान यांची पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर सभागृहाच्या नव्या नेत्याच्या निवड प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे अध्यक्ष शाहबाज शरीफ हे त्यांचे उमेदवार असतील असे संयुक्त विरोधी पक्षाने आधीच जाहीर केले होते. अशा स्थितीत शाहजाब शरीफ यांची रविवारी देशाच्या नवीन पंतप्रधानपदी निवड होऊ शकते. नवीन सरकार सूडाचे राजकारण करणार नाही, असा निर्धार शाहबाज यांनी केला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या घोषणेनंतर शाहबाज म्हणाले, 'मला भूतकाळातील कटुतेकडे परत जायचे नाही. हे विसरून पुढे जावे लागेल. आम्ही कोणताही सूड किंवा अन्याय करणार नाही. आम्ही कुणालाही विनाकारण तुरुंगात टाकणार नाही.

Imran Khan
अशोक चव्हाण थेट पाटील कुटुंबीयांच्या भेटीला; 2 वर्षांपुर्वी दिलेला शब्द पाळला

बिलावल भुट्टो यांनी केले अभिनंदन

विश्वासदर्शक ठरावाच्या निकालानंतर, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल सभागृहाचे अभिनंदन केले. दरम्यान, पीटीआयचे खासदार फैसल जावेद यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान सोडले.

विरोधकांना 174 खासदारांचा पाठिंबा मिळाला

फैसल यांनी ट्विट केले की, 'आत्ताच पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले. ते सन्मापुर्वक निघून गेले आहेत.'' महत्त्वाच्या घडामोडींच्या दरम्यान शनिवारी उशिरा सुरू झालेल्या मतदानाच्या निकालांनी पंतप्रधानांना पदच्युत करण्यासाठी 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये 174 सदस्यांनी एकजुटीने पाठिंबा दिला. आवश्यक बहुमत 172 लागणार होते. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या एकाही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय रद्द केला होता

तत्पूर्वी, सरन्यायाधीश ओमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने गुरुवारी खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याचा नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरचा निर्णय एकमताने नामंजूर केला. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्ली पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्ली बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुकीची शिफारस करण्याचे पंतप्रधानांचे पाऊल "असंवैधानिक" असल्याचे म्हटले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com