Kolkata knight riders twitter
Sports

Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

IPL 2025 Mega Auction KKR: अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. या टीममध्ये अजिंक्यने अनेकदा गरजेच्या वेळी उत्तम कामगिरी केलेली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंवर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही. यामध्ये सुरुवातीच्या राऊंडमध्ये अजिंक्य रहाणेवर देखील कोणी बोली लावली नव्हती. मात्र अखेरीस दुसऱ्या राऊंडमध्ये रहाणेवर बोली लावण्यात आली. यावेळी रहाणेसोबत मोईन अली आणि उमारन मलिकवरही बोली लावली गेली.

अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. या टीममध्ये अजिंक्यने अनेकदा गरजेच्या वेळी उत्तम कामगिरी केलेली आहे. मात्र तरीही आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये सुरुवातीला अजिंक्य रहाणे अनसोल्ड राहिला होता.

आयपीएलमधून कोणाकडून खेळणार रहाणे?

ऑक्शनमध्ये सुरुवातीला अजिंक्य रहाणेवर कोणीही बोली लावली नाही. मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये केकेआरने त्याच्यावर बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. रहाणेची बेस प्राईज 1.50 कोटी रुपये होती. याच किमती तो केकेआरमध्ये सामील झाला.

मोईन आणि उमरान मलिकचीही वाचवली लाज

मोईन अली दीर्घकाळ चेन्नई सुपर किंग्जसोबत होता. तो गेल्या सिझनमध्ये 8 कोटी रुपये मानधन घेऊन खेळला होता. पण यावेळी सीएसकेने त्याला रिटेन केलं नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये आता तो कोलकात्याकडून खेळणार आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोईनवर बोली लागली नव्हती. उमरान मलिकच्या बाबतीत देखील हेच घडलेलं दिसलं. उमरान मलिकला सुरुवातीला कोणीही विकत घेतलं नाही. पण शेवटी KKR ने 75 लाखांच्या बेस प्राईसने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

कशी आहे केकेआरची टीम?

वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, अजिंक्य रहाणे, रमनदीप सिंह, क्विंटन डी कॉक, गुरबाज़, एनरिक नॉर्खिया, रोवमॅन पॉवेल, मनीष पांडे, स्पेंसर जॉनसन, लवनीत सिसोदिया, अनुकूल रॉय, मोइन अली, उमरान मलिक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT