Robin Uthappa Google
Sports

Robin Uthappa : डिप्रेशनमुळे मी माझं जीवन संपवण्याचा...; भारताला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या खेळाडूचा धक्कादायक खुलासा

Robin Uthappa On Depression: अजूनही आपल्या समाजात मानसिक आरोग्याविषयी जनजागृती झाली नाही. मात्र अशा परिस्थितीत रॉबिन उथप्पाने डिप्रेशनविषयीची कहाणी सांगितली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि २००७ च्या टी-२० वर्ल्ड टीमचा हिस्सा असलेल्या रॉबिन उथप्पाने मानसिक आरोग्याविषयी मोठं विधान केलं आहे. यावेळी उथप्पाने डिप्रेशनविषयी भाष्य केलं आहे. त्याच्या आयुष्यात आलेल्या कठीण काळाविषयी बोलताना आपण डिप्रेशनमध्ये गेलो असल्याचं कबूल केलंय.

माजी खेळाडूच्या म्हणण्यानुसार, क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठ्या लढाई लढल्या. मात्र यावेळी डिप्रेशनइतंकी कोणतीही लढाई मोठी नव्हती.

उथप्पाने शेअर केला खास व्हिडिओ

यासंदर्भात रॉबिन उथप्पाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने डिप्रेशनसारख्या गंभीर मुद्द्यावर चर्चा केली आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत उथप्पाने लिहिलंय की, मी क्रिकेटच्या मैदानावर अनेक लढाईंचा सामना केला आहे.

मात्र त्यामध्ये डिप्रेशन इतकी मोठी आणि कठीण लढाई कोणतीच नव्हती. मी मानसिक आरोग्याविषयी मौन सोडतोय कारण मला कल्पना आहे की, मी यामध्ये एकटा नाहीये. स्वतःचं हित लक्षात घेत मदत घ्या आणि आशेचा किरण शोधा.

या व्हिडीओमध्ये उथप्पा म्हणतो की, आपण आत्महत्या आणि डिप्रेशन या गोष्टींबाबत चर्चा करतोय. आपण नुकतंच ग्राहम थोर्प तसंच भारताचे डेविड जॉनसन यांच्याविषयी ऐकलं असेल. याशिवाय अजून अनेक खेळाडू आहेत ज्यांनी नैराश्यामुळे त्यांचं जीवन संपवलं. यापूर्वी देखील डिप्रेशनने ग्रस्त असलेले एथलीट्स आणि क्रिकेटर्स यांच्याविषयी आपण ऐकलं आहे. यावेळी तुम्हाला असं वाटतं की, तुम्ही निरूपयोगी आहात. तसंच आपण इतरांवर केवळ ओझं आहोत, या गोष्टीही मनात येतात.

उथप्पा पुढे म्हणतो की, २०११ चा काळ फार कठीण होता आणि या माझ्या अवस्थेची मला लाज वाटत होती. तुम्हाला माहिती नसतं की, तुम्हाला पुढे काय करायचंय, मात्र यामध्ये कोणतीही समस्या नाही. डिप्रेशनमुळे अनेकांनी त्यांचं आयुष्य संपवलं असं आपण ऐकलं असेल. माझ्या मताने मी देखील त्या काळातून गेलो आहे. ज्यावेळी मी क्लिनीकल डिप्रेशनशी लढा देत होतो, तेव्हा मी पण इतरांवर ओझं आहे. असं मला वाटतं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT