Delhi Capitals net bowler injury SAAM TV
Sports

IPL मध्ये नेट बॉलरला मोठी दुखापत; वेगाने येणारा चेंडू लागल्याने रक्तबंबाळ, रुग्णालयात तातडीने उपचार सुरू

Delhi Capitals net bowler injury: आयपीएल २०२६ दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या सरावात मोठी घटना घडली. वेगवान चेंडू चेहऱ्यावर लागल्याने नेट बॉलर गंभीर जखमी झाला. सामन्यापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे टीमसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२६ च्या सरावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा एक नेट बॉलर गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये. दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे. सामन्यापूर्वीच्या सरावादरम्यान या नेट बॉलरला दुखापत झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, वेगाने येणारा चेंडू चेहऱ्यावर लागल्याने हा तरुण गोलंदाज जमिनीवर कोसळला आणि त्याचा त्याच्या चेहऱ्यावरून रक्त देखील येत होतं.

चेहरा झालेला रक्तबंबाळ

या घटनेनंतरचा व्हिडीओ समोर आला असून या नेट गोलंदाजाला खूप वेदना होत असल्याचं दिसतंय. त्याच्या चेहरा रक्तबंबाळ झाला होता. यावेळी मेडिकल टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी गोलंदाजाची तपासणी केली. त्यानंतर त्या खेळाडूला अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात नेण्यात आलं. दिल्ली कॅपिटल्सने या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

कशी आहे आतापर्यंत दिल्लीची कामगिरी

आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली . त्यांनी पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. त्यानंतर टीमला गुजरातविरुद्ध शेवटच्या चेंडूवर पराभव स्विकारावा लागला.

यानतंर चेन्नई सुपर किंग्सविरुद्धही दिल्लीचा पराभव झाला. डेव्हिड मिलरने शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीविरुद्ध टीमला विजय मिळवून दिला पण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला. दिल्लीने ६ सामन्यापैकी ३ जिंकलेत यामुळे त्यांच्या खात्यात सहा पॉईंट्स असून ते पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहेत.

दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान

दिल्ली कॅपिटल्ससमोर आज पंजाब किंग्सविरुद्ध एक कठीण आव्हान आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सची टीम पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. त्यांनी खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; डहाणू–बोर्डी राज्य मार्ग 60 मीटर वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला

कारल्यापासून बनवा कुरकुरीत भजी; चहा सोबत लागेल मस्त

Lower Back Pain: दिवसभर बसून काम करता? झोपण्याआधी १० मिनिटं करा 'हा' उपाय; पाठदुखीपासून मिळेल आराम

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा महामार्गावर भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

Health Care: जेवल्यानंतरही सतत काहीतरी खावंसं वाटतं? 'या' ७ कारणांमुळे वाढू शकते भूक

SCROLL FOR NEXT