delhi capitals batsman harry brook reavals the real reason behind withdrawal his name from ipl 2024  yandex
Sports

IPL 2024: हॅरी ब्रुकने IPL स्पर्धेतून माघार का घेतली? धक्कादायक कारण आलं समोर

Harry Brook Ruled Out Reason: संघातील आक्रमक फलंदाज हॅरी ब्रुकने स्पर्धेतून माघार घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ४ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले होते

Ankush Dhavre

IPL 2024, Harry Brook Latetst News:

आयपीएल २०२४ स्पर्धा तोंडावर असताना दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एक गुड न्यूज आणि बॅड न्यूज समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला रिषभ पंत आयपीएल २०२४ स्पर्धेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. तर दुसरीकडे संघातील आक्रमक फलंदाज हॅरी ब्रुकने स्पर्धेतून माघार घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ४ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले होते. दरम्यान त्याने संघातून नाव मागे का घेतलं? यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.

हॅरी ब्रुकने नाव मागे का घेतलं?

हॅरी ब्रुकने नाव मागे घेतल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. यासह इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये न घेण्याच्याही चर्चा सुरु आहेत. मात्र हॅरी ब्रुकने स्वत:च स्पर्धेतून माघार घेण्याचं कारण सांगितलं आहे. नुकताच त्याच्या आजीचं निधन झालं आहे. त्यामुळे त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.

ब्रुकने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहीलं की,' मी आगामी आयपीएल स्पर्धेत न खेळण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. मी दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळण्यासाठी खूप उत्साहीत होतो. मला नाही वाटत की, मी माझं वैयक्तिक कारण सांगाव. मात्र काही लोकांना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे मी ही पोस्ट शेअर करतोय.' (Cricket news in marathi)

त्याने पुढे लिहीले की, 'गेल्या महिन्यात माझ्या आजीचं निधन झालं आहे. ती माघ्यासाठी ढालसारखी होती. मी लहानपणापासूनच तिच्यासोबत भरपूर वेळ घालवला आहे. जेव्हा मी घरी असायचो तेव्हा एकही दिवस असा गेला नसेल जेव्हा मी तिला भेटलो नसेल. मला आनंद आहे की, माझी आजी मला इंग्लंडसाठी खेळताना पाहू शकली.' आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला ४ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT