Deepak Chahar Wife Jaya Bhardwaj  Saam TV
क्रीडा

Crime News : भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीला लाखो रुपयांचा गंडा; जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी!

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज दीपक चहर याची पत्नी जया भारद्वाज हिची तब्बल १० लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

Satish Daud

Deepak Chahar Wife Jaya Bhardwaj : क्रिडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज दीपक चहर याची पत्नी जया भारद्वाज हिची तब्बल १० लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने तिच्यासोबत ही फसवणूक केली आहे. याबाबत विचारणा केली असता, या अधिकाऱ्याकडून जयाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. (Latest Marathi News)

याप्रकरणी दीपक चहर याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलिस (Police) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपकच्या हे पैसे एका करारासाठी दिले होते.

मात्र पैसे परत मागितल्यावर क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्याने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. दीपक चहर यांचे कुटुंब आग्रा शहरातील शाहगंज येथील मान सरोबर परिसरात वास्तव्यास आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी दीपक चहरची पत्नी जयासोबत करार केला होता.

करारानुसार, ७ ऑक्टोबर २०२२ रोजी जयाकडून १० लाख रुपये घेतले होते. मात्र वारंवार पैसे मागून सुद्धा या अधिकाऱ्याने ते पैसे परत केले नाही. यावर पैशांची मागणी करण्यासाठी गेलेल्या दीपक चहरच्या पत्नीला त्याने शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या.

दीपक चहर इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा (Cricket News) एक भाग आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाने त्याला १४ कोटी रुपयांमध्ये संघात पुन्हा सामील करून घेतले. दीपक चाहनं गेल्या वर्षी आयपीएलच्या (Sport News) सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये जयाला प्रपोज केलं होतं. यापूर्वी ते अनेक वर्ष एमेकांना डेट करत होते. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान अनेकदा जया दीपक चाहरला सपोर्ट करतानाही दिसत होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT