csk  saam tv
Sports

DC vs CSK Playing 11: सामन्यापूर्वीच CSK च्या चिंतेत वाढ! प्लेऑफमध्ये जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता; वाचा कारण

DC vs CSK Match Details: पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धत आज डबल हेडर सामान्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे.

या हंगामात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्यांदा जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते, त्यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळवला होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी अतिशय महत्वाचा सामना...

चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय.

आज होणाऱ्या सामन्यात जर चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळवला तर चेन्नईचा संघ थेट प्लेऑफ फेरीसाठी पात्र ठरणार आहे. मात्र या सामन्यात पराभूत झाल्यास चेन्नई सुपर किंग्ज संघाला दुसऱ्या संघाच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड..

चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ २८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला १० सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.

कोण मारणार बाजी?

तसं पाहायला गेलं तर, चेन्नईचा संघ मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हे विसरून चालणार नाही की , दिल्लीने गेल्या काही सामन्यांमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे. दिल्लीकडे गमवायला काहीच शिल्लक नाहीये.

त्यामुळे दिल्लीचा संघ बिनधास्त क्रिकेट खेळताना दिसून येऊ शकतो. याचा फटका चेन्नई सुपर किंग्ज संघाला बसू शकतो. कारण या सामन्यातील पराभव चेन्नईसाठी भारी पडू शकतो.(Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी असू शकते दोनी संघांची प्लेइंग ११:

दिल्ली कॅपिटल्स संघाची संभाव्य प्लेइंग ११: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), रिले रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नोरखिया, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग ११: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश थिक्षणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

SCROLL FOR NEXT