David warner Saam Tv
Sports

David Warner Record: दिल्लीचा पराभव मात्र 'वन मॅन शो' बॅटिंग करणाऱ्या वॉर्नरने IPL च्या मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

David Warner Record In IPL : या सामन्यात ६१ धावांची खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

RR VS DC IPL 2023 Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ११ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या.

दरम्यान या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला अवघ्या १४२ धावा करता आल्या. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ५७ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात ६१ धावांची खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाला या हंगामात सूर गवसला नाहीये. सुरुवातीच्या तिनही सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकट्या डेव्हिड वॉर्नरला वगळलं तर इतर फलंदाज धावा करताना संघर्ष करताना दिसून येत आहेत.

दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६५ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने आयपीएल स्पर्धेत ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी तर शिखर धवन दुसऱ्या स्थानी आहे. (Latest sports updates)

आयपीएल स्पर्धेत ६००० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज..

विराट कोहली- ६७२७

शिखर धवन - ६३७०

डेव्हिड वॉर्नर -६००३

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलरने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली.तर यशस्वी जयस्वालने ६० आणि शिमरन हेटमायरने ३० धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला ५७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT