CSK VS SRH Catch Video X
Sports

CSK VS SRH : धावत आला, उडी मारली, हवेत अफलातून कॅच पकडला अन् कामिंदू मेंडिसने सामना फिरवला, Video Viral

CSK VS SRH IPL 2025 : चेन्नईचा डेवाल्ड ब्रेव्हिस चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. आक्रमक खेळी करताना त्याने सर्वाधिक ४२ धावा केल्या. कामिंदू मेंडिसने अशक्य वाटणारा कॅच पकडून डेवाल्ड ब्रेव्हिसला माघारी पाठवला आणि सामना हैदराबादच्या बाजूने झुकला.

Yash Shirke

IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना सध्या चेपॉक स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यामध्ये कामिंदू मेंडिसने उत्कृष्ट कॅच घेतली. त्याने आक्रमक खेळी करणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसला बाद करुन माघारी पाठवले. या सामन्यादरम्यान कामिंदू मेंडिसच्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाराव्या ओव्हरमध्ये हर्षल पटेल गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या पहिल्या ३ चेंडूंमध्ये फक्त १ धाव चेन्नईच्या खेळाडूंनी काढली. चौथ्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेव्हिसने जोरदार षटकार ठोकला. लगेच पाचव्या चेंडूवर ब्रेव्हिसने लाँग ऑफच्या डाव्या बाजूच्या दिशेला गेला. तेव्हा धावत-पळत कामिंदू मेंडिसने अशक्य वाटणारा कॅच पकडला. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या समालोचकांनीही मेंडिसच्या कॅचचे कौतुक केले. डेवाल्ड ब्रेव्हिसची विकेट गेल्यानंतर चेन्नईची फलंदाजी ढेपाळली. या कॅचमुळे सामना हैदराबादकडे झुकल्याचे पाहायला मिळाले.

एमए चिदंबरम स्टेडियमवर आज चेन्नई आणि हैदराबाद हे दोन संघ एकमेकांच्या समोर आले आहेत. टॉस जिंकून हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या गोलंदाजांनी कमिन्सचा निर्णय योग्य ठरवला. सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये, चेन्नईच्या फलंदाजांवर हैदराबादचे गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.

सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंदू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी

इम्पॅक्ट प्लेयर्स - ट्रॅव्हिस हेड, अभिनव मनोहर, सचिन बेबी, राहुल चहर, विआन मुल्डर

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ :

शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेव्हिस, शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक हुडा, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

इम्पॅक्ट प्लेयर्स - अंशुल कंबोज, रविचंद्रन अश्विन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, जेमी ओव्हरटन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT