क्रिकेटप्रेमी भारतात आयोजित होणारा आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु झाला आहे. या हंगामात पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमध्ये सुरु आहे. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांच्या विरोधात दमदार खेळ दाखवला. आरसीबीने सीएसकेला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं.
आरसीबीच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १७३ धावा कुटल्या. आरसीबीसाठी अनुज रावत आणि दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी केली. दोघांनी संकटात सहाव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या फलंदाजीमुळे आरसीबीचा डाव सावरला. रावतने २५ चेंडूमध्ये ४ चौकार आणि तीन षटकार लगावले. रावतने २५ चेंडूत ४८ धावा कुटल्या. तर कार्तिने २८ चेंडूत नाबाद ३८ धावा कुटल्या. दिनेश कार्तिकने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले.
आरसीबीने नाणेफेक जिंकून कर्णधार फाफ डुप्लेसीने २० चेंडूत ३५ धावा कुटल्या. फाफ आणि विराटने पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचली. जलद गोलंदाज मुस्तफिजुरने पाचव्या षटकात डुप्लेसी आणि रजत पाटीदारला बाद केलं. पाटीदारने धोनीच्या हातात झेल दिला. दीपक चहरने सहाव्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. आरसीबीने ७८ धावांवर पाच गडी गमावले. पुढे १२ व्या षटकात मुस्तफिजुरने कोहल आणि कॅमरुन ग्रीनला बाद केले.
१२ व्या षटकानंतर रावत आणि दिनेश कार्तिकने संघाचा डाव सावरला. दोघांनी शेवटच्या चेंडूपर्यंत भागीदारी रचली. रावतच्या ४८ आणि कार्तिकच्या ३८ धावांच्या जीवावर आरसीबीने चेन्नईला १७४ धावांचं आव्हान दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.