MS Dhoni Video Viral 
क्रीडा

Csk vs Rcb: आरसीबीचं सेलिब्रेशन माहीला पाहावे ना? हस्तांदोलन न करताच परतला धोनी

Bharat Jadhav

चेन्नई सुपर किंग्जचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात २७ धावांनी पराभव झाला. आरसीबीविरुद्धचा पराभव एमएस धोनीच्या जिव्हारी लागलाय. सामना संपल्यानंतर सेलिब्रेशन करणाऱ्या आरसीबीला पाहून एम. एस. धोनी हस्तांदोलन न करता माघारी फिरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धोनीच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या सामन्यात धोनी शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करत राहिला, मात्र तो बाद झाल्याने चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाच्या आशा धुळीस मिळाल्या.

आरसीबीकडून सामना हरल्यानंतर आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने धोनीच्या चेहऱ्या दु:ख सर्वांना दिसत होतं. बेंगळुरुकडून शेवटचं षटक यश दयालने टाकले. फिनिशर म्हणून ओळख असलेल्या एमएम धोनीने दयालच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. पण तिसऱ्या चेंडूवर धोनीला बाद करण्यात दयालला यश आले. धोनी १२ चेंडूत २५ धावांवर खेळत असलेला धोनी यश दयालच्या संथ चेंडूवर बाद झाला.

टॉप एजला लागल्याने धोनी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेवर झेलबाद झाला. सामना संपल्यानंतर धोनी विजयी संघाचं अभिनंदन करण्यासाठी पुढे आला. सर्व खेळाडू हे एका रांगेत उभे राहिले. धोनी सर्व खेळांडूपुढे उभा होता. त्यावेळी त्याने पाहिलं की, आरसीबीचे खेळाडू सेलिब्रेशन करण्यात व्यस्त होते. त्यावेळी आरसीबीच्या खेळाडूंना हस्तांदोलन करण्यासाठी आलेल्या धोनीने आरसीबीच्या खेळांडूंची वाट पाहिली परंतु कोणीच न आले नसल्याने धोनी माघारी परतला. धोनीने ड्रेसिंग रूममध्ये परत जाताना फक्त आरसीबी कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केले आणि मैदानाबाहेर गेला.

आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली सीएसकेच्या ड्रेसिंग रूममध्ये जाताना दिसतोय. विराट कोहली एमएस धोनीला शोधत होता. दरम्यान सामन्यादरम्यान बॅटिंग करतानाही कोहली धोनीशी बोलताना दिसला होता. आयपीएलच्या मोसमातील हा सामना संस्मरणीय ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT