CSK Vs PBKS IPL 2025 X
Sports

CSK Vs PBKS : पंजाब किंग्सला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL 2025 मधून बाहेर, टॉसच्या वेळी अय्यरने दिली अपडेट

CSK Vs PBKS IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना चेपॉक स्टेडियमवर सुरु झाला आहे. श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम दाजी करणार असल्याचे सांगितले. आता या संघाचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहेत.

Yash Shirke

IPL 2025 मधील ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्नेयस अय्यरने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चेन्नई सुपर किंग्स हा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.

बोटाला फ्रॅक्चर झाल्याने ग्लेन मॅक्सवेल हा आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. टॉसच्या वेळी पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने मॅक्सवेलच्या दुखापतीची माहिती दिली. ग्लेन मॅक्सवेलचे बाहेर जाणे खूपच दु:खद आहे. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्या जागी कुणाला संधी द्यावी याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही, असे वक्तव्य अय्यरने केले.

ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२५ मध्ये फ्लॉप ठरला होता. सतत संधी मिळूनही त्याला चांगला खेळ करता आला नव्हता. २ सामने त्याला प्लेईंग ११ मधून वगळण्यात आले होते. मागच्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याला मॅक्सवेलचा पुन्हा संधी देण्यात आली होती. पण या सामन्यातही मॅक्सवेलने चाहत्यांना निराश केले. तो फक्त ७ धावा केल्या होत्या. आयपीएल २०२५ मध्ये मॅक्सवेलने १० सामन्यांमध्ये ५२ धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

प्रियांश आर्य, जॉश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार) नेहाल वढेरा, शशांक सिंह, हरप्रीत ब्रार, मार्को यान्सन, अजमतुल्लाह उमरजाई, सूर्यांश शेगडे, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह

इम्पॅक्टचे पर्याय - प्रभसिमरन सिंह, जेवियर बार्टलेट, प्रवीण दुबे, मुशीर खान, विजयकुमार वैशाक

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवॉल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हूडा, एमएस धोनी, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथीराना

इम्पॅक्टचे पर्याय - अंशुल कंबोज, आर. अश्विन, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT