MS Dhoni google
क्रीडा

IPL 2022 : महेंद्र सिंग धोनीची षटकारांची आतषबाजी; दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडला

नरेश शेंडे

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या मोसमात (IPl 2022) चेन्नई सुपर किंग्जचा (csk) माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra singh dhoni) चमकदार कामगिरी करत आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात धीनीने शेवटच्या षटकात जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर ४ चेंडूत १६ धावा कुटल्या आणि मुंबईचा दारुण पराभव झाला. त्यामुळे धोनीनं तो अजूनही जगातील उत्तम फिनिशर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं. आंतरराष्ट्रीय सामना असो वा आयपीएलचा धोनीनं षटकार नाही ठोकला, असं खूप कमी वेळा झालं असेल. पण धोनी आणि षटकारांचं नातं हे खूपच घट्ट असल्याचं आपल्याला नेहमी त्याच्या आक्रमक फलंदाजीतून पाहायला मिळंतं. धोनीची यंदाच्या आयपीएलमध्येही षटकारांची आतीषबाजी सुर आहे. त्यामुळे धोनीच्या षटकारांचा आलेख उंचावला असून मिस्टर आयपीएल सुरेश रैनाचा (Suresh Raina) विक्रम धोनीनं मोडीत काढलाय.

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा आणि महेंद्र सिंग धोनीनं सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण शेवटच्या षटकात धोनी बाद झाल्याने चेन्नईचा पराभव झाला. धोनीनं या सामन्यात ८ चेंडूमध्ये एक षटकार आणि १ चौकार मारत १२ धावा केल्या. धोनीनं या सामन्यात ठोकलेला षटकार त्याच्या नावावर एक नवा विक्रम करुन गेला. त्यामुळे धोनी आता चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.

एम एस धोनीनं तोडला सुरेश रैनाचा विक्रम

चेन्नई सुपर किंग्सचा आक्रमक फलंदाज महेंद्र सिंग धोनीनं पंजाबच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात एक षटकार मारत सुरेश रैनाचा २१९ षटकारांचा विक्रम मोडला. त्यामुळे सीएसकेसाठी आयपीएलमध्ये २२० षटकार ठोकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाल आहे. तर चेन्नईच्या संघासाठी आयपीएलमध्ये ९३ षटकार मारणारा चेन्नईचा माजी खेळाडू फॅब डुप्लेसी तिसऱ्या स्थानावर आहे.

चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वात जास्त षटकार मारणाने फलंदाज

एम एस धोनी- 220 षटकार

सुरेश रैना- 219 षटकार

फाफ डुप्लेसिस- 93 षटकार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT