IPL 2023 Tushar Deshpande on Rohit Sharma saam tv
Sports

Tushar Deshpande On Fake News: रोहित शर्माबद्दलच्या वक्तव्यावर चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडेचा मोठा खुलासा, म्हणाला....

Tushar Deshpande on Rohit Sharma : रोहित शर्माला बाद करणे एकदम सोपे आहे असे तो म्हणाल्याबाबतच्या अनेक बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. मात्र आता त्याने समोर येऊन यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Chandrakant Jagtap

IPL 2023 Tushar Deshpande on Rohit Sharma : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा युवा गोलंदाज तुषार देशपांडे सध्या चर्चेत आला आहे. रोहित शर्माबाबतच्या वक्तव्यावरून त्याला प्रचंड टिकेचा सामना करावा लागला. रोहित शर्माला बाद करणे एकदम सोपे आहे असे तो म्हणाल्याच्या अनेक बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. मात्र आता त्याने समोर येऊन यावर स्पष्टीकरण दिले आहे.

आयपीएलमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात तुषार देशपांडेने रोहित शर्माला क्लिन बोल्ड केले. अप्रतिम स्विंग बॉल टाकत त्याने रोहितला चकवले. ही रोहितची विकेट पोहून संपूर्ण देशातील चाहते आश्चर्यचकीत झाले. स्वतः रोहितही त्याच्याकडे बघतच राहिला. या विकेटनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील झाला. परंतु त्यानतंर एका वक्तव्याामुळे त्याला टीका सहन करावी लागली.

तुषार देशपांडेचा मोठा खुलासा...

या सामन्यानंतर तुषार देशपांडेने रोहित शर्माबाबत बोलताना रोहितला बाद करणे एकदम सोपे आहे, असे वक्तव्य केल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. परंतु हे सर्व फेक असून मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही असा मोठा खुलासा तुषार देशपांडेने केला आहे. त्याने त्याच्या इंस्टा स्टोरीवर या सर्व बातम्यांचे स्क्रीनशॉट पोस्ट करत या सर्व बातम्या फेक म्हणजेच खोट्या असल्याचे सांगितले आहे. (Sports News)

तुषार काय म्हणाला....?

तुषारने हे विधान पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला आहे. रविवारी इन्स्टा स्टोरीमध्ये स्पष्टीकरण दिले. त्याने रोहित शर्माबाबात केलेल्या वक्तव्याबाबतच्या सर्व बातम्या पोस्ट करत त्याने लिहिले की, ' हे सर्व फेक आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व दिग्गज खेळाडूंचा मला पूर्ण आदर आहे. मी अशी अपमानास्पद विधाने कधीच दिली नाहीत आणि देणारही नाही. अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT