Cricket news saam tv
Sports

Cricket news: धक्कादायक! भारताला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या क्रिकेटरला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Indian cricketer: लंका प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी अंडर-19 क्रिकेटपटू मनजोत कालरा याला श्रीलंकेच्या स्पोर्ट्स अँटी करप्शन युनिटने लाच प्रकरणात ताब्यात घेतलं.

Surabhi Jayashree Jagdish

17 जुलैपासून श्रीलंकेत लंका प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात होत आहे. मात्र स्पर्धा सुरू होण्याआधीच एक मोठा वाद समोर आला आहे. भारताचा माजी अंडर-19 क्रिकेटपटू मनजोत कालरा याला श्रीलंकेच्या स्पोर्ट्स अँटी करप्शन युनिटने ताब्यात घेतलंय. मनजोत हा लंका प्रीमियर लीगमधील जाफना किंग्स टीमचा सह-मालक आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

श्रीलंकेत क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष तपास पथक (स्पोर्ट्स अँटी करप्शन युनिट) काम करतं. या पथकाने मनजोत कालराविरुद्ध कारवाई केली आहे.

श्रीलंका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंका प्रीमियर लीग सुरू होण्याच्या सुमारे दहा दिवस आधी मनजोत कालराने एका खेळाडूला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित खेळाडूने याची तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला आणि त्यानंतर मनजोतला अटक करण्यात आली.

LPL पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

लंका प्रीमियर लीग वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाही. याच वर्षी स्पर्धेतील एका अन्य फ्रँचायझीच्या मालकावर मॅच फिक्सिंग प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्याला चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

मनजोत कालरा आधीही वादात

मनजोत कालराने 2018 मध्ये भारताच्या अंडर-19 वर्ल्डकप विजेत्या टीममध्ये स्थान मिळवलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने शतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मात्र त्यानंतर त्याच्यावर वयाबाबत फसवणूक केल्याचा आरोप झाला. दिल्ली पोलिसांच्या तपासात त्याने आपले वय एका वर्षाने कमी दाखवून अंडर-19 क्रिकेट खेळल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणाचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला आणि हळूहळू तो क्रिकेटपासून दूर गेला.

याच वर्षी मनजोत कालरा जाफना किंग्सचा सह-मालक बनला होता. मात्र आता लाच देण्याच्या आरोपामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परांडा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या अन् दगडफेकीने भर चौकात गोंधळ

Rinku Rajguru: नाजूक टिकली, मोकळे केस अन् पांढरी साडी; रिंकू राजगुरूचा सोज्वळ शृंगाराची भुरळ

Ganpati Festival: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ५२२० बसेस धावणार, सरकारकडून मोठं गिफ्ट

Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्राचा वाद पेटला, मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले, मी कुणाचा मिंधा...

Mouth Ulcer Causes: तोंडात वारंवार अल्सर होतात? फक्त तिखट पदार्थ नाही, यामागे असू शकतात 'ही' ७ कारणं

SCROLL FOR NEXT