Ron Draper Death Saamt v
Sports

Ron Draper Cricketer Death: सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटरचं निधन; कारकिर्दीत फक्त केल्या 25 धावा

Ron Draper Death: जगातील सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू आणि दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज रॉन ड्रॅपर यांचे निधन झाले आहे. 28 फेब्रुवारी रोजी वयाच्या 98 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Bharat Jadhav

जगातील सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू आणि दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज रॉन ड्रॅपर यांचे निधन झाले. 28 फेब्रुवारी रोजी वयाच्या 98 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. रॉन ड्रॅपर हे सलामीवरचे फलंदाज होते. तसेच ते यष्टीरक्षक देखील होते. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फक्त 2 कसोटी सामने खेळलेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या 2 सामन्यात त्यांनी केवळ 25 धावा करता आल्या होत्या. ड्रॅपर हे आतापर्यंतचे सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटर होते. याआधी दक्षिण आफ्रिकेचे कसोटी दोन्ही क्रिकेटपटू हे सर्वात वयोवृद्ध होते. नॉर्मन गॉर्डन, 2016 मध्ये वयाच्या 103 व्या वर्षी आणि जॉन वॅटकिन्स 2021 मध्ये वयाच्या 98 व्या वर्षी मरण पावले. पण आता हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नील हार्वेच्या नावावर आहे. ते आता त्यांचे वय 96 वर्ष 144 दिवस आहे.

वयाच्या 19 व्या वर्षी प्रथम श्रेणी पदार्पण

रॉन ड्रॅपर ह्यांनी फक्त दोन कसोटी सामने खेळले असले तरी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात एक महत्त्वपूर्ण स्थान होते. 24 डिसेंबर 1926 रोजी जन्मलेल्या ड्रॅपरने वयाच्या 19 व्या वर्षी प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. त्यांनी ऑरेंज फ्री स्टेट विरुद्ध ईस्टर्न प्रोव्हिन्ससाठी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. 1950 च्या दशकात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण केले.

ड्रॅपर यांनी 1960 पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होते. या कालावधीत त्यांनी 41.64 च्या सरासरीने 3290 धावा केल्या ज्यात 11 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर 32 झेल आणि 10 स्टंपिंगचाही समावेश आहे. ड्रॅपरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लंचपूर्वी चार शतके झळकावली होती. करी कप सामन्यात दोन शतके करणारे ते पहिले खेळाडू होते.

ड्रॅपरने प्रथम श्रेणीत पदार्पण करताना शतके झळकावलीत. त्यांनी 1949-50 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्यांच्या इस्टर्न प्रोव्हिन्स संघासाठी 86 धावा केल्या. यानंतर त्यांची ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या शेवटच्या 2 कसोटींसाठी निवड झाली. यादरम्यान त्यांना 3 डावात फलंदाजीची संधी मिळाली पण तो केवळ 25 धावा करू शकले. त्यानंतर त्यांना कधीही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT