Ishan Kishan SAAM TV
Sports

Ishan Kishan: ...तर मी 300 धावाही करु शकलो असतो, ईशाने किशनने सांगितलं कॅलक्युलेशन

ईशानच्या त्या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ishan Kishan : बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर ईशान किशनने इतिहास रचला. ईशानने या सामन्यात 210 धावांची तुफानी खेळी खेळली आणि तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज बनला.

धडाकेबाज द्विशतक झळकावल्यानंतर इशान किशनने एका मुलाखतीत सांगितले की, तो 300 धावाही करू शकला असता. ईशानच्या  (Ishan Kishan)  त्या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुलाखतीत ईशान किशनने सांगितले की, जेव्हा तो आऊट झाला तेव्हा जवळपास 15 षटके बाकी होती. अशा स्थितीत तो नाबाद राहिला असता तर त्याला 300 धावाही करता आल्या असत्या. 131 चेंडूत 210 धावा करणाऱ्या ईशान किशनने अवघ्या 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले.

मुलाखतीत अँकरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ईशान किशन म्हणाला की, पिच फलंदाजीसाठी उत्तम होतं. ईशान किशन वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय आणि जगातील सातवा खेळाडू ठरला आहे. (Sports News)

सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांच्या यादीत नाव जोडले गेले. याबाबत ईशान म्हणाला की, या दिग्गजांसोबत माझे नाव ऐकून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. पण खरं सांगायचे तर मला अजूनही वाटते की मी 300 धावा करू शकलो असतो, कारण जेव्हा मी आऊट झालो तेव्हा 15 षटके बाकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य आणि हार्बर लाईनवर 'मेगा ब्लॉक'; कोणत्या गाड्या बंद राहणार?

नोबेलसाठी पाकची युद्धात मध्यस्थी? काकासाठी पुतणी मागते नोबेल

अमेरिकेनंतर भारतातही झोम्बीचा शिरकाव, भारतीय तरुणाई झोम्बी ड्रग्जच्या विळख्यात?

Sonam Wangchuk : कारगिल युद्धाचे महानायक कर्नल सोनम वांगचुक यांचे निधन

चेंजिंग रुम की ब्लॅकमेलिंगचा अड्डा? विकृत दुकानदाराचा कारनामा उघड

SCROLL FOR NEXT