harendra shah saam tv
क्रीडा

Cricket Coach News: भारतीय खेळाडूला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाचा काळा चेहरा उघडकीस; अश्लील क्लिप व्हायरल होताच उचलले मोठे पाऊल

Harendra Shah: क्रिकेट अॅकेडमीत प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत असलेले हरेंद्र शाह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Ankush Dhavre

Cricket coach Harendra Shah booked in inappropriate action: सध्या क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघातील दिग्गज महिला खेळाडू तसेच डेहराडूनच्या क्रिकेट अॅकेडमीत प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत असलेले हरेंद्र शाह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

पोलिसांनी त्यांना जातीवाचक शिव्या, धमकावणे आणि महिला खेळाडूंवर लैंगिक अत्यावर करण्याच्या आरोपात अटक केली आहे.

इतकेच नव्हे तर त्यांच्या अॅकेडमीतील महिला खेळाडूंनी हरेंद्र शाह यांच्यावर शरीर सुखाची मागणी केली असल्याचा देखील आरोप केला आहे.

हरेंद्र शाह हे आपल्या अॅकेडमीत १३ ते १८ वयोगातील मुलींना प्रशिक्षण द्यायचे. एक ऑडिओ क्लिप व्हायरल होताच, त्यांनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. यानंतर त्यांच्यावर विनयभंग आणि लैंगिक छळ करण्याचे आरोप करण्यात आले होते.

हरेंद्र शाहच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या एका खेळाडूचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये हरेंद्र शाह त्या महिला खेळाडूला लैंगिक संबंध ठेवण्यास सांगत आहे, तसेच तिला शिवीगाळ देखील करत आहे.

या अश्लील शब्दांचा ऑडिओ क्लिप व्हायरल होताच हरेंद्र शाहने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest sports updates)

हरेंद्र शाहच्या अॅकेडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय क्रिकेटपटूच्या वडिलांनी नेहरू कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होती.

या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, त्यांच्या मुलीचा अनेकदा विनयभंग करण्यात आला. या तक्रारीनंतर हरेंद्र शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती

Jalgaon Accident : निवडणूक ड्युटीसाठी जाताना अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात; तीन जण जखमी

Winter Season: हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Rinku Rajguru: आर्चीला पाहून म्हणाल सैराट झालं जी...

Rahul Gandhi: राहुल गांधी हाजीर हो! पुणे न्यायालयाने बजावला समन्स, २ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT