Rohit Sharma Criticized by Congress Leader  
Sports

Rohit Sharma : रोहित शर्मा जाडा आहे, काँग्रेस नेत्याची वादग्रस्त पोस्ट, सर्वात खराब कर्णधार असल्याचेही म्हटले

Rohit Sharma Criticized by Congress Leader: रोहित शर्मा जाडा आहे, तो भारताचा सर्वात खराब कर्णधार असल्याची पोस्ट काँग्रेसच्या नेत्याने केली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे.

Namdeo Kumbhar

Rohit Sharma Criticized by Congress Leader : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करत आहे. भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा विजयाकडे आगेकूच करत आहे. आशातच काँग्रेसच्या नेत्याने रोहित शर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेय. काँग्रेस प्रवक्ता डॉ शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माला जाडा असल्याचे म्हटलेय. त्याशिवाय रोहित शर्मा भारताचा सर्वात खराब कर्णधार असल्याचेही त्यांनी म्हटलेय. रोहित शर्मा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वा अनइम्प्रेसिव कर्णधार आहे, असे पोस्टमध्ये काँग्रेस नेत्याने म्हटलेय. (Controversial Post by Congress Leader Labels Rohit Sharma "Fat and Unimpressive as Captain")

रोहित शर्मा जाडा, वजन कमी करण्याची गरज -

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरू असताना काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी आपल्या एक्स खात्यावरून रोहित शर्माबाबत वादग्रस्त पोस्ट केली. रोहित शर्माला टॅग करत त्यांनी वादग्रस्त पोस्ट केली. एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा खूपच जाडा आहे, त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. रोहित शर्मा भारताचा सर्वात खराब कर्णधारही आहे, असे शमा यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे

भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या फिटनेसवर गेल्या काही दिवसांत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण रोहित शर्माने आपल्या कामगिरीने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. फिल्डिंग, मोठी खेळी यातून रोहित शर्माने अनेकदा टीकाकारांना जोरदार उत्तर दिले.. रोहित शर्मा याच्या फिटनेसवर अनेकदा सवाल उपस्थित करण्यात येतो, पण प्रत्येकवेळा तो आपल्या कामगिरीने प्रत्युत्तर देत असतो.

साधारण खेळाडू, कर्णधार केलं -

शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मा साधारण खेळाडू आहे, त्याला कर्णधार करण्यात आल्याचेही म्हटलेय. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या तुलनेत रोहित शर्मा कुठेच नाही. गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री आणि इतर खेळाडूंच्या तुलनेत रोहित शर्मा कुठे वर्ल्ड क्लास आहे. तो एक साधारण खेळाडू अन् साधारण कर्णधार आहे. नशीब चांगले असल्यामुळे रोहित शर्माला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली, असे शमा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.

रोहित शर्माची कामगिरी -

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. लागोपाठ तिसऱ्या आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाने शानगार प्रदर्शन केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात २०२४ मध्ये टी २० विश्वचषकावर नाव कोरले. २०२३ वनडे विश्वचषकात भारतीय संघ उपविजेता ठरला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारताने धडक मारली आहे. रोहित शर्माने फलंदाजी आणि नेतृत्वात शानदार कामगिरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT